# प्रायश्चित्त, अर्पण ## व्याख्या: "प्रायश्चित" आणि "अर्पण" या शब्दांचा संदर्भ, परमेश्वराने कसे लोकांच्या पापांची किंमत मोजण्यासाठी आणि पापाबद्दलचा त्याचा राग शांत करण्यासाठी बलिदान कसे पुरवले याच्याशी आहे. * जुन्या कराराच्या काळात, देवाने इस्राएल राष्ट्राच्या पापांसाठी, एखाद्या प्राण्याचा बळी देऊन त्याच्या रक्ताचे अर्पण करण्याद्वारे, तात्पुरती प्रायश्चित्त करण्याची परवानगी दिली. * नवीन करारात नमूद केल्याप्रमाणे, वधस्तंभावरील ख्रिस्ताचा मृत्यू हा पापांसाठी एकमात्र खरे आणि कायमचे प्रायश्चित आहे. * जेव्हा येशू मरण पावला, तेव्हा त्याने शिक्षा आपणावर घेतली ज्या शिक्षेस पाप केल्यामुळे लोक पात्र होते. स्वतःच्या मृत्युच्या यज्ञासंबंधाने, त्याने प्रायश्चित्ताची किंमत भरली. ## भाषांतर सूचना * "प्रायश्चित्त" या शब्दाचा अर्थ "किंमत भरणे" किंवा "किंमत भरण्यासाठी भरपाई देणे" किंवा "एखाद्याच्या पापांची क्षमा होण्यासाठी निमित्त बनणे" किंवा "अपराधाची भरपाई करणे" या शब्द किंवा वाक्यांशाद्वारे भाषांतरित केला जाऊ शकतो. * "प्रायश्चित्त" भाषांतरीत करण्याच्या पद्धतींमध्ये "भरपाई" किंवा "पापाच्या भरपाईसाठी बलिदान" किंवा "क्षमा करण्याचे साधन प्रदान करणे" समाविष्ट असू शकते. * या संज्ञेच्या भाषांतराचा पैसे भरपाईशी काहीही संबंध नाही हे सुनिश्चित करा. (हे सुद्धा पहा: [दयासन](../kt/atonementlid.md), [क्षमा करणे](../kt/forgive.md), [विनंती](../kt/propitiation.md), [समेट करणे](../kt/reconcile.md), [सोडवणे](../kt/redeem.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [यहेज्केल 43:25-27](rc://mr/tn/help/ezk/43/25) * [यहेज्केल 45:18-20](rc://mr/tn/help/ezk/45/18) * [लेवीय 04:20-21](rc://mr/tn/help/lev/04/20) * [गणना 05:8-10](rc://mr/tn/help/num/05/08) * [गणना 28:19-22](rc://mr/tn/help/num/28/19) # Strong's * Strong's: H3722, H3725, G2643