# पवित्र आत्मा, देवाचा आत्मा, परमेश्वराचा आत्मा, आत्मा ## तथ्य या संज्ञा सर्व पवित्र आत्म्याला संदर्भित आहेत, जो देव आहे. एकच खरा देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा म्हणून सार्वकालीकतेने अस्तित्वात आहे. * पवित्र आत्म्याला “आत्मा” आणि “परमेश्वराचा आत्मा” आणि “सत्याचा आत्मा” असेही म्हटले जाते. * कारण पवित्र आत्मा देव आहे, तो पूर्णपणे पवित्र आहे, अपरिमितपणे शुद्ध आहे, आणि त्याच्या सर्व स्वभावात आणि तो जे काही करतो त्यामध्ये नैतिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. * पिता आणि पुत्रासमवेत, पवित्र आत्मा जगाच्या निर्मितीमध्ये सक्रिय होता. * जेव्हा देवाचा पुत्र येशू स्वर्गात परत गेला तेव्हा देवाने आपल्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना शिकविण्यास, दिलासा देण्यास आणि देवाच्या इच्छेनुसार करण्यास सक्षम होण्यासाठी पवित्र आत्मा पाठविला. * पवित्र आत्म्याने येशूला मार्गदर्शन केले आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना तो मार्गदर्शन करतो. ## भाषांतरातील सूचना: * ही संज्ञा “पवित्र” आणि “आत्मा” असे भाषांतर करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या शब्दासह भाषांतरीत करता येईल. * हा शब्द भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये “शुद्ध आत्मा” किंवा “आत्मा जो पवित्र आहे” किंवा “देव जो आत्मा” यांचा समावेश असू शकतो. (हे देखील पाहा: [पवित्र], [आत्मा], [देव], [प्रभु], [देव पिता], [देवाचा पुत्र], [भेट]) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 शमुवेल10:10] * [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 04:7-8] * [प्रेषितांचे कृत्ये 08:17] * [गलतीकरांस पत्र 05:25] * [उत्पत्ती 01:1-2] * [यशया 63:10] * [ईयोब 33:04] * [मत्तय 12:31] * [मत्तय 28:18-19] * [स्तोत्रसंहीता 051:10-11] ## पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे: * __[01:01]__ पण __ देवाचा आत्मा__ पाण्यावर होता. * __[24:08]__ बाप्तिस्मा घेतल्यावर येशू पाण्यातून बाहेर आला तेव्हा, __देवाचा आत्मा__कबुतराच्या रुपात प्रकट झाला आणि खाली आला व त्याच्यावर स्थिर झाला. * __[26:01]__ सैतानाच्या मोहांवर विजय मिळवल्यानंतर, येशू __पवित्र आत्म्याच्या__सामर्थ्याने तो राहत असलेल्या गालील प्रदेशात परतला. * __[26:03]__ येशू वाचतो, “देवाने मला __ त्याचा आत्मा__ दिला आहे” जेणेकरून मी गोरगरीबांना सुवार्ता घोषित करावी, बंदिवानांना मुक्त करावे, आंधळ्यांना दृष्टी द्यावी आणि दडपलेल्यांना सोडवावे.” * __[42:10]__ "म्हणून जा, सर्व लोकांना पिता, पुत्र आणि __पवित्र आत्म्याच्या__ नावाने बाप्तिस्मा देऊन शिष्य करा आणि मी तुला जे आज्ञापिले आहे ते सर्व पाळायला शिकवा." * __[43:03]__ ते सर्व __पवित्र आत्म्याने__ भरले आणि ते अन्य भाषांमध्ये बोलू लागले. * __[43:08]__ “आणि येशूने वचन दिल्याप्रमाणे त्याने __पवित्र आत्मा__”पाठविला आहे. आपण आता ज्या गोष्टी पाहात आणि ऐकत आहात त्या सर्वांनाच “पवित्र आत्मा” कारणीभूत आहे. ” * __[43:11]__ पेत्राने उत्तर दिले, “तुमच्यातील प्रत्येकाने पश्चात्ताप केला पाहिजे व येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतला पाहीजे, यासाठी की देव तुमच्या पापांची क्षमा करील. मग तो तुम्हाला __पवित्र आत्म्याचे__ दान देईल.” * __[45:01]__ त्याची (स्तेफन) चांगली प्रतिष्ठा होती आणि तो__पवित्र आत्मा __ आणि शहाणपणाने परिपूर्ण होता. ## शब्द संख्या: * स्ट्रॉन्गचे: एच3068, एच6944, एच7307, जी40, जी4151