# पवित्रस्थान ## व्याख्या: पवित्र शास्त्रामध्ये, "पवित्रस्थान" आणि "अति पवित्रस्थान" या शब्दांचा संदर्भ निवासमंडपाच्या किंवा मंदिराच्या इमारतींच्या दोन भागांशी आहे. * "पावित्रस्थान" ही पहिली खोली होती, ज्यात धूप जाळण्याची वेदी आणि एक मेज होते ज्यावर विशेष "उपस्थितीची भाकर" होती. * "अति पावित्रस्थान" ही दुसरी सर्वात आतील खोली होती, आणि त्यात कराराचा कोश होता. * एक जाड आणि जड पडदा बाहेरच्या खोलीला आतील खोलीपासून वेगळे करत होता. * महायाजक हा असा एकच व्यक्ती होता, ज्याला अतिपवित्र स्थानात जाण्याची परवानगी होती. * कधीकधी "पवित्र स्थान" हे मंदिर किंवा निवासमंडप ह्यांच्या, दोन्ही इमारती आणि अंगण क्षेत्रास सूचित करते. सर्वसाधारणपणे, ते देवासाठी वेगळ्या केलेल्या कोणत्याही जागेला संदर्भित करते. ## भाषांतर सूचना * "पावित्रस्थान" या शब्दाचे भाषांतर "देवासाठी वेगळी केलेली खोली" किंवा "देवाला भेटण्याची विशेष खोली" किंवा "देवासाठी राखून ठेवलेली जागा" असे केले जाऊ शकते. * "अति पावित्रस्थान" या शब्दाचे भाषांतर "देवासाठी सर्वात वेगळी केलेली खोली" किंवा "देवाला भेटण्याची सर्वात विशिष्ठ खोली" असे केले जाऊ शकते. * संदर्भावर आधारित, "एक पवित्रस्थान" या सामान्य अभिव्यक्तीचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "एक पवित्रस्थान" किंवा "देवाने वेगळी केलेली जागा" किंवा "मंदिराच्या परिसरातील जागा, जी पवित्र आहे" किंवा "देवाच्या पवित्र मंदिराचे आंगण" ह्यांचा समावेश होतो. (हे सुद्धा पहा: [धूपवेदी](../other/altarofincense.md), [कराराचा कोश](../kt/arkofthecovenant.md), [भाकर](../other/bread.md), [पवित्र करणे](../kt/consecrate.md), [आंगण](../other/courtyard.md), [पडदा](../other/curtain.md), [पवित्र](../kt/holy.md), [वेगळे केलेला](../kt/setapart.md), [निवासमंडप](../kt/tabernacle.md), [मंदिर](../kt/temple.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 राजे 06:16-18](rc://*/tn/help/1ki/06/16) * [प्रेषितांची कृत्ये 06:12-15](rc://*/tn/help/act/06/12) * [निर्गम 26:31-33](rc://*/tn/help/exo/26/31) * [निर्गमन 31:10-11](rc://*/tn/help/exo/31/10) * [यहेज्केल 41:1-2](rc://*/tn/help/ezk/41/01) * [एज्रा 09:8-9](rc://*/tn/help/ezr/09/08) * [इब्री 09:1-2](rc://*/tn/help/heb/09/01) * [लेवीय 16:17-19](rc://*/tn/help/lev/16/17) * [मत्तय 24:15-18](rc://*/tn/help/mat/24/15) * [प्रकटीकरण 15:5-6](rc://*/tn/help/rev/15/05) * Strong's: H1964, H4720, H4725, H5116, H6918, H6944, G39, G40, G3485, G5117