# पवित्र, पवित्रता, अपवित्र, वेगळे केलेले ## व्याख्या: “पवित्र” आणि “पवित्रता” हे शब्द देवाच्या स्वभावाला संदर्भित करतात जो पाप आणि अपरिपूर्ण असलेल्या सर्व गोष्टीपासून पूर्णपणे वेगळा आहे. * फक्त देवच पूर्णपणे पवित्र आहे. तो लोक आणि वस्तू यांना पवित्र करतो. * जो व्यक्ती पवित्र आहे तो देवाचा आहे आणि त्याची सेवा करण्यासाठी आणि त्याचे गौरव व्हावे या उद्देशाने तो वेगळा झाला आहे. * देवाने पवित्र घोषित केलेली वस्तु अशी आहे जी त्याने त्याचे गौरव व उपयोग यासाठी वेगळी केली आहे, जसे की वेदी त्याला अर्पण करण्याच्या उद्देशाने आहे. * त्याने परवानगी दिल्याशिवाय लोक त्याच्याकडे येऊ शकत नाही, कारण तो पवित्र आहे आणि ते केवळ मानव, पापी आणि अपूर्ण आहेत. जुन्या करारात, देव त्याच्या खास सेवेसाठी याजकांना वेगळे करतो. देवाकडे जाण्यासाठी त्यांना पापापासून विधीवत शुद्ध करावे लागले. * देव निश्चित ठिकाणे पवित्र म्हणून वेगळी करतो शब्दशः, "अपवित्र" या शब्दाचा अर्थ "पवित्र नाही" असा आहे. हे एखाद्याचे किंवा एखाद्या गोष्टीचे वर्णन करते जे देवाचा आदर करीत नाही. * हा शब्द एखाद्याच्या विरोधात बंडखोरी करुन देवाचा अनादर करणाऱ्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. * ज्या गोष्टीला “अपवित्र” म्हटले जाते त्याचे वर्णन सामान्यत: भ्रष्ट किंवा अशुद्ध असे केले जाऊ शकते. हे देवाचे नाही. “वेगळे केलेले” या शब्दामध्ये अश्या काही गोष्टींचे वर्णन केले आहे जे देवाची उपासना करण्याशी किंवा खोट्या देवतांच्या मूर्तिपूजक उपासनेशी संबंधित आहे. * जुन्या करारामध्ये खोट्या देवतांच्या पूजेसाठी वापरल्या जाणार्‍या दगडी खांब आणि इतर वस्तूंचे वर्णन करण्यासाठी “वेगळे केलेले” हा शब्द बहुधा वापरला जात असे. याचे भाषांतर “धार्मिक” असे देखील केले जाऊ शकते. * “पवित्र गाणे” आणि “पवित्र संगीत” हे संगीताला संदर्भित करते जे देवाच्या गौरवासाठी गायले गेले किंवा वाजवले गेले. हे "परमेश्वराची उपासना करणारे संगीत" किंवा "देवाची स्तुती करणारी गाणी" असे भाषांतरित केले जाऊ शकते. * “वेगळे केलेले कर्तव्ये” या शब्दाचा अर्थ “धार्मिक कर्तव्ये” किंवा “धार्मिक विधी” असा होतो जे याजकांनी लोकांना देवाच्या उपासनेत नेण्यासाठी केले. यात मूर्तिपूजकाच्या खोट्या देवतांची उपासना करण्यासाठी केल्या जाणार्‍या विधींचा देखील संदर्भ असू शकतो ## भाषांतर सूचना: * “पवित्र” भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये “देवासाठी वेगळे केलेले” किंवा “देवाचे” किंवा “पूर्णपणे शुद्ध” किंवा “पूर्णपणे निर्दोष” किंवा “पापापासून विभक्त” याचा समावेश असू शकतो. * “पवित्र बनविणे” हे बर्‍याचदा इंग्रजीमध्ये “पवित्र करणे” म्हणून भाषांतरित केले जाते. त्याचे भाषांतर “देवाच्या गौरवासाठी (एखाद्याला) वेगळे करणे” असे देखील केले जाऊ शकते. * “अपवित्र” भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये “पवित्र नाही” किंवा “देवाचे नाही” किंवा “देवाचा मान राखत नाही” किंवा “धार्मिक नाही” याचा समावेश असु शकतो. * काही संदर्भांमध्ये, “अपवित्र” या शब्दाचे भाषांतर “अशुद्ध” असे केले जाऊ शकते. (हे देखील पाहा: [पवित्र आत्मा], [पवित्र], [पवित्र केलेले], [वेगळे करणे]) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [उत्पत्ती 28:22] * [2 राजे 03:02] * [विलापगीत 04:01] * [यहेज्केल 20:18-20] * [मत्तय 07:6] * [मार्क 08:38] * [प्रेषितांचे कृत्ये 07:33] * [प्रेषितांचे कृत्ये 11:08] * [रोमकरांस पत्र 01:02] * [2 करिंथकरांस पत्र 12:3-5] * [कलस्सैकरांस पत्र 01:22] * [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 03:13] * [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 04:07] * [2 तिमथ्याला 03:15] ## पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे: * __[01:16] __ त्याने (देवाने) सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि ते __पवित्र__ केले, कारण या दिवशी त्याने आपल्या कामापासून विश्रांती घेतली. * __[09:12] __ "तू __पवित्र__ जागेवर उभा आहेस." * __[13:01]__ "जर तुम्ही माझे ऐकले आणि माझा करार पाळला तर तुम्ही माझी विकत घेतलेली संपत्ती व्हाल, याजकांचे राज्य आणि एक __पवित्र__ राष्ट्र.' * __[13:05]__ “शब्बाथ दिवस नेहमीच __पवित्र__पाळण्याची खात्री करा" * __[22:05]__ “तर बाळ __पवित्र__, देवाचा पुत्र असेल.” * __[50:02]__ जशी आम्ही येशू परत येण्याची वाट पाहत आहोत, देवाची इच्छा आहे की आपण अशा मार्गाने जगावे जो__ पवित्र__ आहे आणि त्याचा सन्मान करणारा आहे. ## शब्द संख्या: * स्ट्रॉन्गचे: एच430, एच2455, एच2623, एच4676, एच4720, एच6918, एच6922, एच6942, एच6944, एच6948, जी37, जी38, जी39, जी40, जी41, जी42, जी462, जी1859, जी2150, जी2412, जी2413, जी2839, जी3741, जी3742