# देव पिता, स्वर्गीय पिता, पिता ## तथ्य “देव पिता” आणि “स्वर्गीय पिता” या संज्ञा अर्थ एकच खरा देव, यहोवाला संदर्भित करतात. “पिता” असा समान अर्थ असलेला आणखी एक शब्द, येशू जेव्हा त्याचा उल्लेख करीत असे तेव्हा पुष्कळदा वापरला जात असे. * देव, देव पिता, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा या नात्याने अस्तित्वात आहे. प्रत्येकजण पूर्णपणे देव आहे आणि तरीही ते फक्त एकच देव आहेत. हे एक रहस्य आहे जे केवळ मानवांना पूर्णपणे समजू शकत नाही. * देव पित्याने देव पुत्राला (येशूला) जगात पाठवले आणि तो त्याच्या लोकांकडे पवित्र आत्मा पाठवितो. * जो कोणी देव पुत्रावर विश्वास ठेवतो तो देव पित्याचा पुत्र होतो, आणि देव जो पवित्र आत्मा त्या व्यक्तीमध्ये राहण्यासाठी येतो. हे आणखी एक रहस्य आहे जे मानवांना पूर्णपणे समजू शकत नाही. ## भाषांतरातील सूचना: * “देव पिता” या संज्ञाचे भाषांतर करताना नैसर्गिकरित्या मानवी पित्यासाठी वापरल्या जाणार्‍या “पिता” या शब्दाने भाषांतर करणे उत्तम आहे. * “स्वर्गीय पिता” या संज्ञाचे भाषांतर “स्वर्गात राहणारा पिता” किंवा “स्वर्गात राहणारा आपला देव पिता” किंवा “स्वर्गातील आपला देव पिता.” असे केले जाऊ शकते. * सहसा जेव्हा देव असे म्हटले जाते तेव्हा “पिता” हे अक्षर मोठे लिहीले जाते. (भाषांतर सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे] (हे देखील पाहा: [पूर्वज], [देव], [स्वर्ग], [पवित्र आत्मा], [येशू], [देवाचा पुत्र]) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 करिंथकरांस पत्र08:4-6] * [1 योहान 02:01] * [1 योहान 02:23] * [1 योहान 03:01] * [कलस्सैकरांस पत्र 01:1-3] * [इफिसकरांस पत्र 05:18-21] * [लूक 10:22] * [मत्तय 05:16] * [मत्तय 23:09] ## पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे: * __[24:09]__ फक्त एकच देव आहे. परंतु योहानाने ˍˍˍˍ देव पित्याचे बोलणे ऐकले, आणि जेव्हा त्याने येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा येशु जो पुत्र आणि पवित्र आत्मा यांना त्याने पाहीले. * __[29:09]__ मग येशू म्हणाला, “जर तुम्ही आपल्या भावाला मनापासून क्षमा केली नाही तर माझा __स्वर्गीय पिता__ तुम्हा प्रत्येकासाठी तसेच करील.” * __[37:09]__ मग येशूने स्वर्गाकडे पाहीले आणि म्हणाला, “__पित्या__, माझे ऐकल्याबद्दल धन्यवाद.” * __[40:07]__ मग येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे पूर्ण झाले आहे __पित्या__, मी माझा आत्मा तुझ्या हाती देतो. ” * __[42:10]__ “म्हणून जा, सर्व लोकांना “ __पिता__, पुत्र ”आणि“ पवित्र आत्मा ”यांच्या नावाने बाप्तिस्मा देऊन शिष्य करा आणि मी तुला केलेल्या सर्व आज्ञा पाळायला शिकवा.” * __[43:08]__ "येशू आता __देव पिता__ याच्या उजवीकडे बसलेला आहे." * __[50:10]__ "मग नीतिमान लोक __देव जो त्यांचा पिता__ याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील." ## शब्द संख्या: * स्ट्रॉन्गचे: एच1, एच2, जी3962