# कृपा, दया करेल (अनुकूल), पक्षपातीपणा ## व्याख्या: "कृपा करणे" म्हणजे प्राधान्य देणे. जेंव्हा एखादा एका व्यक्तीवर कृपा करतो, तो त्या व्यक्तीला सकारात्मक मानतो आणि इतरांच्या फायद्यासाठी तो जितके करतो, त्याच्यापेक्षा जास्त तो त्या व्यक्तीच्या फायद्यासाठी करतो. * "पक्षपातीपणा" या शब्दाचा अर्थ काही लोकांच्याप्रती अनुकूल कार्य करण्याची वृत्ती ठेवणे पण इतरांच्या प्रती नाही. ह्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवर निवडण्याचा कल असणे किंवा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर कारण ती व्यक्तीला किंवा वस्तूला प्राधान्य असते. सर्वसाधारणपणे, पक्षपातीपणाला अनुचित मानले जाते. * येशू मनुष्यांच्या आणि देवाच्या "कृपेत" वाढला. ह्याचा अर्थ त्यांनी त्याचे चारित्र्य आणि स्वभाव मंजूर केला. * एखाद्याच्या नजरेमध्ये "कृपा प्राप्त" करणे या अभिव्यक्तीचा अर्थ कोनाएकाला त्या व्यक्तीने स्वीकार करणे असा होतो. * जेंव्हा राजा एखाद्यावर कृपा दाखवतो, तेंव्हा त्याचा अर्थ सहसा असा होतो की, त्याने त्या व्यक्तीची विनंती मंजूर केली आणि तिला अनुदान दिले. * एक "कृपा" ही दुसऱ्या व्यक्तीच्या फायद्याच्या दिशेने एक हावभाव किंवा कृती देखील होऊ शकते. ## भाषांतर सूचना * "कृपा" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "आशिर्वाद" किंवा "फायदा" ह्यांचा समवेश होऊ शकतो. * "यहोवाच्या कृपेचे वर्ष" ह्याचे भाषांतर "वर्ष (किंवा वेळ) जेंव्हा यहोवा महान आशीर्वाद आणील" असे केले जाऊ शकते. * "पक्षपातीपणा" या शब्दाचे भाषांतर "पक्षपात" किंवा "पूर्वग्रहदूषित असणे" किंवा "अन्यायी वागणूक" असे केले जाऊ शकते. हा शब्द "आवडता" या शब्दाशी संबंधित आहे, ज्याचा अर्थ "असा एक ज्याला प्राधान्य किंवा सर्वोत्तम प्रेम दिले जाते" असा होतो. # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 शमुवेल 02:25-26](rc://*/tn/help/1sa/02/25) * [2 इतिहास 19:6-7](rc://*/tn/help/2ch/19/06) * [2 करिंथ. 01:11](rc://*/tn/help/2co/01/11) * [प्रेषितांची कृत्ये 24:26-27](rc://*/tn/help/act/24/26) * [उत्पत्ति 41:14-16](rc://*/tn/help/gen/41/14) * [उत्पत्ति 47:25-26](rc://*/tn/help/gen/47/25) * [उत्पत्ति 50:4-6](rc://*/tn/help/gen/50/04) * Strong's: H995, H1156, H1293, H1779, H1921, H2580, H2603, H2896, H5278, H5375, H5414, H5922, H6213, H6437, H6440, H7521, H7522, H7965, G1184, G3685, G4380, G4382, G5485, G5486