# सुवार्तिक ## व्याख्या: "सुवार्तिक" हा असा व्यक्ती आहे, जो इतर लोकांना येशू ख्रिताबद्दलची शुभ वार्ता सांगतो. * "सुवर्तिक" या शब्दाचा शब्दशः अर्थ, असा कोणीतरी जो शुभ वर्तमानाचा संदेश देतो. * येशूने त्याच्या प्रेषितांना, कसे आपण येशू ख्रिस्तावर आणि पापासाठी त्याने केलेल्या बलीदानाद्वारे, देवाच्या राज्याचे सहभागी होऊ शकतो, ह्याची शुभ वार्ता पसरवण्यासाठी बाहेर पाठीवले. * सर्व ख्रिस्ती लोकांना ही शुभ वार्ता पसरवण्याची विनंती आहे. * काही ख्रिस्ती लोकांना शुभवर्तमान परिणामकारक सांगण्याचे विशिष्ठ वरदान दिलेले असते. या लोकांना सुवार्तेचे वरदान आहे असे म्हंटले जाते, आणि त्यांना "सुवार्तिक"असे म्हंटले जाते. ## भाषांतर सूचना: * "सुवार्तिक" या शब्दाचे भाषांतर, "असा कोणी जो शुभ वर्तेचा संदेश देतो" किंवा "शुभवर्तमानाचा शिक्षक" किंवा "असा व्यक्ती जो (येशूची) शुभ वार्ता घोषित करतो" किंवा "शुभवर्तमानाची घोषणा करणारा" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहाः [शुभ वार्ता](../kt/goodnews.md), [आत्मा](../kt/spirit.md), [वरदान](../kt/gift.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [2 तीमथ्य 04:3-5](rc://*/tn/help/2ti/04/03) * [इफिसकरांस पत्र 04:11-13](rc://*/tn/help/eph/04/11) * Strong's: G2099