# षंढ, खोजी ## व्याख्या: सहसा "षंढ" या शब्दाचा संदर्भ अशा मनुष्याशी आहे, ज्याला नपुंसक बनवले आहे (किंवा ज्याचे वृषण काढलेले आहे). हा शब्द नंतर एक समान्य संज्ञा बनली, जिचा संदर्भ एक शासकीय अधिकाऱ्याशी येतो, जरी त्याच्यामध्ये काही व्यंग नसले तरी. * येशूने म्हंटले की, कदाचित खराब झालेल्या संभोग करण्याच्या अवयावांमुळे, किंवा लैंगिकदृष्ट्या कार्य करण्यास सक्षम नसल्यामुळे, काही लोक अशा पद्धतीने षंढ बनतात. इतर लोक ब्रम्हचारी जीवनशैली जगण्यासाठी षंढाप्रमाणे राहतात. * प्राचीनकाळी, खोजी हे सहसा राजाचे सेवक असत, ज्यांना स्त्रियांच्या निवासस्थानावरील रक्षक म्हणून नेमण्यात आले होते. * काही खोजी हे महत्वाचे शासकीय अधिकार होते, जसे की, इथिओपियाचा षंढ जो प्रेषित फिलीप्पाला वाळवंटात भेटला. (हे सुद्धा पाहा: [फिलिप्प](../names/philip.md)) ## पवित्र शास्त्रामधील संदर्भ: * [प्रेषितांची कृत्ये 08:26-28](rc://*/tn/help/act/08/26) * [प्रेषितांची कृत्ये 08:36-38](rc://*/tn/help/act/08/36) * [प्रेषितांची कृत्ये 08:39-40](rc://*/tn/help/act/08/39) * [यशया 39:7-8](rc://*/tn/help/isa/39/07) * [यिर्मया 34:17-19](rc://*/tn/help/jer/34/17) * [मत्तय 19:10-12](rc://*/tn/help/mat/19/10) * Strong's: H5631, G2134, G2135