# एफोद ## व्याख्या: एफोद हे वर बांधावयाच्या मलवस्त्रासारखा कपडा होता ज्याला इस्राएली याजक घालत असत. त्याला दोन भाग होते, पुढचा आणि मागचा, जे खांद्याजवळ एकत्रित होत होते, आणि कमरेभोवती कापडाच्या पट्ट्याने बांधायचे होते. * असा एक प्रकारचा एफोद त्याला सध्या तागाच्या कपड्यापासून बनवलेले होते, ज्याला सामान्य याजक घालत होते. * जे एफोद महायाजक घालत होते, त्याला सोने, निळे, जांभळे, आणि लाल धाग्यांनी सुंदर वेलबुट्टीदर बनवले जात होते. * महायाजकाच्या उरस्त्राणाला एफोदाचा पुढचा भाग जोडलेला होता. उरस्त्राणाच्या पाठीमागे उरीम आणि थुम्मीम ह्यांचे जतन केले होते, जे ठराविक समस्यांमध्ये देवाची इच्छा काय आहे, हे विचारण्यासाठीचे दगड होते. * गिदोन शास्त्याने मूर्खपणाने सोन्याचा एफोद बनवला आणि ते इस्राएली लोक उपासना करण्याची मूर्ती असे काहीतरी बनले. (हे सुद्धा पहा: [याजक](../kt/priest.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 शमुवेल 02:18-19](rc://*/tn/help/1sa/02/18) * [निर्गम 28:4-5](rc://*/tn/help/exo/28/04) * [होशे 03:4-5](rc://*/tn/help/hos/03/04) * [शास्ते 08:27-28](rc://*/tn/help/jdg/08/27) * [लेवीय 08:6-7](rc://*/tn/help/lev/08/06) * Strong's: H641, H642, H646