# वधस्तंभावर खिळणे, वधस्तंभावर खिळलेला ## व्याख्या: "वधस्तंभावर खिळणे" म्हणजे एखाद्याला वधस्तंभाला जोडून ठेवणे आणि तेथे त्याला दुःख सोसण्यासाठी आणि मोठ्या वेदनेत मरण्यासाठी सोडून देण्याची अंमलबजावणी करणे. * पीडितांना एक तर वधस्तंभाशी बांधले जायचे किंवा खिळले जायचे. वधस्तंभावरील लोक रक्त जाऊन किंवा गुदमरून मरायचे. * जे भयंकर गुन्हेगार होते, किंवा ज्यांनी सरकारच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात बंड केले होते, अशा लोकांच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यांना मारण्यासाठी, प्राचीन रोमी सम्राट वारंवार या पद्धतीचा अवलंब करत होते. * यहुदी धर्मपुढाऱ्यांनी रोमी अधिकाऱ्यांना त्यांच्या सैनिकांना येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा करण्यास सांगितले. सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खिळले. त्याने तेथे सहा तास त्रास सहन केला आणि नंतर तो मेला. ## भाषांतर सूचना * "वधस्तंभावर खिळणे" या शब्दाचे भाषांतर "वधस्तंभावर मारणे" किंवा "वधस्तंभावर खिळून मरणे" असे केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [वधस्तंभ](../kt/cross.md), [रोमी](../names/rome.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [प्रेषितांची कृत्ये 02:22-24](rc://*/tn/help/act/02/22) * [गलतीकरांस पत्र 02:20-21](rc://*/tn/help/gal/02/20) * [लुक 23:20-22](rc://*/tn/help/luk/23/20) * [लुक 23:33-34](rc://*/tn/help/luk/23/33) * [मत्तय 20:17-19](rc://*/tn/help/mat/20/17) * [मत्तय 27:23-24](rc://*/tn/help/mat/27/23) ## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे: * __[39:11](rc://*/tn/help/obs/39/11)__ परन्तु यहूदी पुढारी व लोकसमुदाय मोठयाने ओरडले, ‘‘त्याला __वधस्तंभावर__ खिळून टाका!’’ * __[39:12](rc://*/tn/help/obs/39/12)__ जमाव आपल्या विरुध्द बंड पुकारील अशी पिलातास भिती वाटली व त्याने आपल्या सैनिकांस येशूला __वधस्तंभावर__ खिळण्याची आज्ञा दिली. * __[40:01](rc://*/tn/help/obs/40/01)__ सैनिकांनी येशूची थट्टा उडविल्यानंतर, ते त्यास __वधस्तंभावर__ खिळे ठोकून मारण्यासाठी घेऊन गेले. ज्या वधस्तंभावर त्यास मारावयाचे होते तो वधस्तंभ त्यांनी त्याच्या खांद्यावर दिला. * __[40:04](rc://*/tn/help/obs/40/04)__ येशूला दोन लुटारुंच्या मधोमध __वधस्तंभावर__ खिळण्यात आले. * __[43:06](rc://*/tn/help/obs/43/06)__ "अहो इस्राएल लोकांनो, येशूने देवाच्या शक्तिद्वारे अनेक चिन्हे व अद्भुत कार्ये केली, जी तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिली व तुम्हाला माहीत आहेत. पण तुम्ही त्यास __वधस्तंभावर__ खिळले!" * __[43:09](rc://*/tn/help/obs/43/09)__ "तुम्ही येशू या मनुष्यास, __वधस्तंभावर__ खिळले. * __[44:08](rc://*/tn/help/obs/44/08)__ पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरा होऊन तुम्हापुढे उभा आहे. * तुम्ही येशूला __खिळले__, परंतु देवाने त्यास पुन्हा जिवंत केले! * Strong's: G388, G4362, G4717, G4957