# संस्कार करणे, संस्कार केला, संस्काराचा (समर्पनासाठी) ## व्याख्या: संस्कार करणे ह्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला देवाच्या सेवेसाठी समर्पित करणे असा होतो. ज्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा संसाक्र केला जातो, तिला पवित्र समजले जाते, आणि देवासाठी वेगळे केले जाते. * या शब्दाचा अर्थ, "शुद्ध करणे" किंवा "पवित्र करणे" या शब्दांसारखाच होतो, पण, त्यामध्ये एखाद्याला देवाच्या सेवेसाठी औपचारिकरित्या बाजूला काढणे या अर्थाचा समावेश होतो. * ज्या गोष्टींचा देवासाठी संस्कार केला जातो, त्यामध्ये बलिदान करावयाचा प्राणी, होमार्पनाची वेदी आणि निवासमंडप ह्यांचा समावेश होतो. * ज्या लोकांचा देवासाठी संस्कार केला जातो, त्यामध्ये, याजक, इस्राएली लोक, मोठे पुरुष बालक ह्यांचा समावेश होतो. * काहीवेळा "संस्कार करणे" या शब्दाचा अर्थ "शुध्द करणे" या शब्दाच्या अर्थाशी समान असतो, विशेषकरून जेंव्हा त्याचा संबंध लोकांना किंवा वस्तूंना देवाच्या सेवेसाठी तयार करण्याशी येतो, जेणेकरून ते लोक शुद्ध होऊन देवासाठी स्वीकृत होतील. ## भाषांतर सूचना: * "संस्कार करणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "देवाच्या सेवेसाठी वेगळा केलेला" किंवा "देवाच्या सेवेसाठी शुद्ध केलेला" असे केले जाऊ शकते. * "पवित्र" आणि "शुद्ध करणे" या शब्दाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते हे देखील समजून घ्या. (हे सुद्धा पहाः [पवित्र](../kt/holy.md), [शुद्ध](../kt/purify.md), [शुद्ध करणे](../kt/sanctify.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 तीमथ्य 04:3-5](rc://*/tn/help/1ti/04/03) * [2 इतिहास 13:8-9](rc://*/tn/help/2ch/13/08) * [यहेज्केल 44:19](rc://*/tn/help/ezk/44/19) * Strong's: H2763, H3027, H4390, H4394, H5144, H5145, H6942, H6944, G1457, G5048