# ख्रिस्त, मसीहा ## तथ्य: “मसीहा” आणि “ख्रिस्त” या शब्दाचा अर्थ “अभिषिक्त” आणि देवाचा पुत्र येशू याला संदर्भित करते. * “मसीहा” आणि “ख्रिस्त” या दोन्ही संज्ञेचा उपयोग नव्या करारामध्ये देवाच्या पुत्राचा उल्लेख करण्यासाठी केला आहे, ज्याला देवपित्याने आपल्या लोकांवर राजा म्हणून राज्य करण्यासाठी व पाप व मृत्यू यापासून वाचवण्यासाठी नेमले आहे. * जुन्या करारात संदेष्ट्यांनी ख्रिस्त पृथ्वीवर येण्यापूर्वी शेकडो वर्षांपूर्वी भविष्यवाण्या लिहून ठेवल्या. * जुन्या करारात “अभिषिक्त (एक)” हा शब्द येणाऱ्या मसीहाचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो. * येशूने यातील अनेक भविष्यवाण्या पूर्ण केल्या आणि त्याने चमत्कारिक कामे केली ज्याने तो मसीहा असल्याचे सिद्ध केले; जेव्हा तो परत येईल तेव्हा या उरलेल्या भविष्यवाण्या पूर्ण होतील. * “ख्रिस्तामध्ये” आणि “ख्रिस्त येशू” या शब्दाप्रमाणेच “ख्रिस्त” हा शब्द शीर्षक म्हणून पुष्कळदा वापरला जातो. * जसे “येशू ख्रिस्तामध्ये” त्याच्या नावाचा भाग म्हणून “ख्रिस्त” हा शब्द देखील वापरला गेला. ## भाषांतरातील सुचना: * ही संज्ञा तीचा अर्थ वापरून भाषांतरीत केली जावू शकते “अभिषिक्त” किंवा “देवाचा अभिषिक्त तारणारा”. * * बर्‍याच भाषा लिप्यंतरित शब्द वापरतात ज्या “ख्रिस्त” किंवा “मसीहा” यासारख्या दिसतात किंवा बोलल्या जातात. (पाहा: [अज्ञात भाषांतर कसे करावे]) * लिप्यंतरण शब्द, “ख्रिस्त, अभिषिक्त.” या शब्दाच्या परिभाषा असु शकतात. हे संपूर्ण पवित्र शास्त्रात कसे भाषांतरित केले जाते त्यामध्ये सुसंगत रहा जेणेकरून हे स्पष्ट होईल की त्याच शब्दाचा उल्लेख केला जात आहे. * "मसीहा" आणि "ख्रिस्त" याचे भाषांतर त्या संदर्भात चांगले कार्य करतात याची खात्री करा जिथे दोन्ही शब्द एकाच वचनात आढळतात (जसे योहान1:41). (हे देखिल पाहा: [नावे भाषांतर कशी करावी]) (हे देखिल पाहा: [देवाचा पुत्र], दाविद, येशू, अभिषेक) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 योहान 05:1-3] * [प्रेषित 02:35] * [प्रेषित 05:40-42] * [योहान 01:40-42] * [योहान 03:27-28] * [योहान n 04:25] * [लुक 02:10-12] * [मत्तय 01:16] ## पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे: * __[17:07]__ मसीहा_ हा देवाने निवडलेला होता जो जगातील लोकांना पापांपासून वाचवेल. * __[17:08]__ हे घडण्यापूर्वीच, इस्त्राएली लोकांना __मसीहा__ येण्यापूर्वी बरीच प्रतीक्षा करावी लागणार होती, सुमारे 1000 वर्षे. * __[21:01]__ सुरुवातीपासूनच, देवाने __मसीहाला__ पाठवण्याची योजना केली. * __[21:04]__ देवाने राजा दावीदाला वचन दिले होते की __मसीहा__ दावीदाच्या स्वतःच्या वंशातील एक होईल.. * __[21:05]__ मसीहा_ नवीन कराराची सुरूवात करील. * __[21:06]__ देवाच्या संदेष्ट्यांनी असेही म्हटले होते की __मसीहा__ एक संदेष्टा, याजक आणि राजा असेल. * __[21:09]__ संदेष्टा यशयाने अशी भविष्यवाणी केली की __मसीहाचा__ जन्म कुमारीकेपासून होईल. * __[43:07]__ "परंतु देवाने त्याला ही भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा जीवंत केले की ," तू आपल्या पवित्र जनास थडग्यात कुजू देणार नाही.'” * __[43:09]__ "परंतु हे निश्चितपणे जाणून घ्या की देवाने येशूला प्रभु व __मसीहा__ हे दोन्ही करून ठेविले आहे!" * __[43:11]__ पेत्राने उत्तर दिले, “तुमच्यातील प्रत्येकाने पश्चात्ताप केला पाहिजे व येशू __ ख्रिस्ताच्या__नावात बाप्तिस्मा घेतला पाहीजे, जेणेकरून देव तुमच्या पापांची क्षमा करील.” * __[46:06]__ येशू हा __मसीहा__ आहे हे सिद्ध करून शौलाने यहुद्यांशी वाद घातला. ## शब्दांची संख्या: * स्ट्रॉन्गचे: एच4899, जी3323, जी5547