# पुन्हा जन्मलेला, देवापासून जन्मलेला, नवीन जन्म ## व्याख्या: “पुन्हा जन्म” या शब्दाचा उपयोग येशूने प्रथम एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिकरीत्या मृत असण्यापासून आध्यात्मिकरीत्या जिवंत असणे याचा देवासाठी अर्थ काय होतो याचे वर्णन करण्यासाठी केला. “देवापासून जन्मलेला” आणि “आत्म्यापासून जन्मलेला” ह्या संज्ञा देखिल एखाद्या व्यक्तीला नवीन आध्यात्मिक जीवन देण्यात आले आहे याला संदर्भित करतात. * सर्व मानव आध्यात्मिकरित्या मृत जन्माला येतात आणि जेव्हा ते येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतात तेव्हा त्यांना “नवीन जन्म” दिला जातो. * अध्यात्मिक नवीन जन्माच्या क्षणी, देवाचा पवित्र आत्मा नवीन विश्वासणाऱ्यात राहू लागतो आणि त्याला आपल्या जीवनात चांगले आध्यात्मिक फळ देण्यास सामर्थ्य देतो. * एखाद्या व्यक्तीचा पुन्हा जन्म होणे आणि आपले मूल होणे हे देवाचे कार्य आहे. ## भाषांतर सूचना: * “पुन्हा जन्मलेला” असे भाषांतरित करण्याच्या इतर मार्गांमध्ये “नवीन जन्मलेले” किंवा “आध्यात्मिकरित्या जन्मलेला” यांचा समावेश असू शकतो.” * या संज्ञाचा शब्दशः अनुवाद करणे आणि जन्मलेला यासाठी वापरल्या जाणार्‍या भाषेत सामान्य शब्द वापरणे उत्तम आहे. * "नवीन जन्म" या संज्ञेचे भाषांतर "आध्यात्मिक जन्म" म्हणून केले जावू शकते. * “देवापासून जन्मलेला” या वाक्यांशाचे भाषांतर “देवापासून नवजात बाळासारखे नवीन जीवन प्राप्त झालेले” किंवा “देवाने नवीन जीवन दिले.” असे केले जाऊ शकते. * त्याच प्रकारे, “आत्म्याने जन्मलेला” हे भाषांतर “पवित्र आत्म्याद्वारे नवीन जीवन प्राप्त झालेला” किंवा “पवित्र आत्म्याद्वारे देवाचे मुल होण्यासाठी सामर्थ्यवान” किंवा “आत्म्याद्वारे नवजात बाळासारखे नवीन जीवन मिळालेला” असे भाषांतर केले जाऊ शकते. ” (हे देखिल पाहा: [पवित्र आत्मा], [वाचवणे]) ## पविशास्त्रातील संदर्भ: * [1 योहान 03:09] * [1 पेत्र 01:03] * [1 पेत्र 01:23] * [योहान03:04] * [योहान 03:07] * [तीत03:05] ## शब्द संख्या: * स्ट्रॉन्गचे: जी313, जी509, जी1080, जी3824