# बाप्तिस्मा ## व्याख्या: नवीन करारामध्ये, "बाप्तिस्मा" या शब्दाचा संदर्भ सहसा ख्रिस्ती पाण्याने स्नान करून दाखवून देतो की तो पापापासून शुद्ध केला गेला आहे आणि ख्रिस्ताबरोबर एकजूट झाला आहे याच्याशी आहे. * पाण्याच्या बाप्तिस्म्याव्यतिरिक्त, "पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा" आणि "अग्नीने बाप्तिस्मा" याविषयी सुद्धा पवित्र शास्त्र बोलते. * पवित्र शास्त्रामध्ये "बाप्तिस्मा" या शब्दाचा संदर्भ मोठ्या दुःखातून जाण्याशी सुद्धा आहे. ## भाषांतर सूचना * एका व्यक्तीने पाण्याने बाप्तिस्मा कसा करावा याबद्दल ख्रिस्ती लोकांच्यामध्ये वेगवेगळे दृष्टीकोन आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनी पाण्याने बाप्तिस्मा करणे असे सामान्यपणे या शब्दाचे भाषांतर करण्याचा उत्तम मार्ग आहे. * संदर्भाच्या आधारावर, "बाप्तिस्मा" या शब्दाचे भाषांतर "शुद्ध होणे," "बाहेर टाकणे," "आत बुडणे" किंवा "धुणे" किंवा "आध्यात्मिकरित्या शुद्ध होणे" असे केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, "पाण्याने बाप्तिस्मा करणे" याचे भाषांतर "पाण्यात बुडवून काढणे" असाही होऊ शकतो. * "बाप्तिस्मा" या शब्दाचे भाषांतर "शुध्दीकरण," "च्या वर ओतणे," "बुडवणे", "शुद्ध करणे," किंवा "आत्मिक धुणे" असे होऊ शकते. * जेव्हा हे दुःखांना सूचित करते तेव्हा "बाप्तिस्मा" याचे "भयंकर दुःखाचा काळ" किंवा "गंभीर दुःखातून जाण्याद्वारे शुध्दीकरण" असे भाषांतर केले जाऊ शकते. * स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर केले गेले आहे हे देखील विचारात घ्या. (हे सुद्धा पहाः [अज्ञात कसे भाषांतरित करायचे](rc://*/ta/man/translate/translate-unknown) (हे सुद्धा पहा: [बाप्तिस्मा करणारा योहान](../names/johnthebaptist.md), [पश्चाताप](../kt/repent.md), [पवित्र आत्मा](../kt/holyspirit.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [प्रेषितांची कृत्ये 02:37-39](rc://*/tn/help/act/02/37) * [प्रेषितांची कृत्ये 08:36-38](rc://*/tn/help/act/08/36) * [प्रेषितांची कृत्ये 09:17-19](rc://*/tn/help/act/09/17) * [प्रेषितांची कृत्ये 10:46-48](rc://*/tn/help/act/10/46) * [लुक 03:15-16](rc://*/tn/help/luk/03/15) * [मत्तय 03:13-15](rc://*/tn/help/mat/03/13) * [मत्तय 28:18-19](rc://*/tn/help/mat/28/18) ## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे: * __[24:03](rc://*/tn/help/obs/24/03)__ योहानाचा संदेश ऐकून अनेक लोकांनी पश्चाताप केला आणि योहानाने त्यांना __बाप्तिस्मा__ दिला. अनेक धार्मिक पुढारी देखील __बाप्तिस्मा__ घेण्यासाठी आले, परंन्तु त्यांनी आपल्या पापांविषयी पश्चात्ताप केला नव्हता व आपले पाप कबूल केले नव्हते. * __[24:06](rc://*/tn/help/obs/24/06)__ दूस-या दिवशी येशू योहानाकडून __बाप्तिस्मा__ घेण्यासाठी आला. * __[24:07](rc://*/tn/help/obs/24/07)__ योहान येशूला म्हणाला, ‘‘मी तुला __बाप्तिस्मा__ देण्यास पात्र नाही. त्याऐवजी मला तुझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची आवश्यकता आहे. * __[42:10](rc://*/tn/help/obs/42/10)__ म्हणून, तुम्ही जा व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना __बाप्तिस्मा__ द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा. * __[43:11](rc://*/tn/help/obs/43/11)__ पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चाताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये __बाप्तिस्मा__ घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील. * __[43:12](rc://*/tn/help/obs/43/12)__ तेव्हा सुमारे 3,000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेविला व ते येशूचे शिष्य झाले. त्यांनी __बाप्तिस्मा __ घेतला व यरूशलेमेच्या मंडळीमध्ये सामिल झाले. * __[45:11](rc://*/tn/help/obs/45/11)__ फिलिप्प आणि कूशी अधिकारी पुढे प्रवास करत-करत एका तळ्याजवळ आले. कूशी अधिकारी म्हणाला, "पाहा! येथे पाणी आहे! मी __बाप्तिस्मा__ घेऊ शकतो का?" * __[46:05](rc://*/tn/help/obs/46/05)__ लगेच शौलाला पुन्हा दिसू लागले, आणि हनन्याने त्यास __बाप्तिस्मा__ दिला. * __[49:14](rc://*/tn/help/obs/49/14)__ येशू आपणांस आमंत्रण देत आहे यासाठी की तुम्ही विश्वास धरावा व __बाप्तिस्मा__ घ्यावा. * Strong's: G907