# दयासन ## व्याख्या: "दयासन" हे सोन्याची शीला होती जे कराराच्या कोशाचे वरचे भाग आच्छादित करत असे बऱ्याच इंग्रजी भाषांतरामध्ये त्याला "प्रायश्चित्त आच्छादन" असे म्हटले आहे. * दयासन हे सुमारे 115 सेंटीमीटर लांब आणि रुंदी 70 सेंटीमीटर होते. * दयासनाच्या वरच्या बाजूला दोन करूब करून त्यांचे पंख एकमेकांना जोडलेले असावेत. दयासनावरून आणि करुबांच्या दोन्ही पसरलेल्या पंखांच्या खालून मी इस्राएल लोकांना भेटत जाईन असे याहोवाने सांगितले होते. या मार्गाने याहोवाला भेटण्याची परवानगी फक्त महायाजकाला लोकांचा प्रतिनिधी म्हणून दिलेली होती. * कधीकधी या दयासानाला "दयाळूपणाचे आसन" असे म्हटले जाते कारण ते पापी मनुष्यांना मुक्त करण्यासाठी खाली उतरून आलेल्या परमेश्वराची कृपा कळवतो. ## भाषांतर सूचना * या शब्दाचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग म्हणजे "पवित्र कोशाचे आच्छादन जेथे परमेश्वराने सोडवण्याचे आश्वासन देतो" किंवा "जागा जिथे देवाला अर्पणे दिली जातात" किंवा "पवित्र कोशाचे झाकण जिथे देव क्षमा करतो आणि पुनर्रचना करतो." * याचा अर्थ "विनंतीचे स्थान" असाही होऊ शकतो. * या संज्ञेचा "प्रायश्चित्त", "विनंती," आणि "उद्धार" हे शब्द आपण कसे भाषांतरित करतो याच्याशी तुलना करा. (हे सुद्धा पाहा: [कराराचा कोश](../kt/arkofthecovenant.md), [प्रायश्चित्त](../kt/atonement.md), [करुब](../other/cherubim.md), [विनंती](../kt/propitiation.md), [सोडवणे](../kt/redeem.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [निर्गमन 25:15-18](rc://*/tn/help/exo/25/15) * [निर्गम 30:5-6](rc://*/tn/help/exo/30/05) * [निर्गम 40:17-20](rc://*/tn/help/exo/40/17) * [लेवीय 16:1-2](rc://*/tn/help/lev/16/01) * [गणना 07:89](rc://*/tn/help/num/07/89) * Strong's: H3727, G2435