# दत्तकपण, दत्तक, ## व्याख्या: "दत्तक" आणि "दत्तकपण" या शब्दांचा संदर्भ कायद्याने एखाद्या व्यक्तीचे मुल बनण्याशी आहे जे त्याचे जैविक पालक नसतात. * पवित्र शास्त्रामध्ये "दत्तकपण" आणि "दत्तक घेणे" हा शब्द हे वर्णन करण्यासाठी वापरण्यात आला आहे कि कसा देव लोकांना आपल्या कुटुंबाचा भाग बनवून त्यांना आपले आध्यात्मिक मुले आणि मुली बनवितो. * दत्तक मुलांप्रमाणे, देव विश्वासणाऱ्यांना मुले व मुलींचे सर्व विशेषाधिकार देऊन येशू ख्रिस्ताबरोबर सह-वारस बनवितो. ## भाषांतर सूचना * पालक-बालकांच्या संबंधाच्या विशेष वर्णनाचे भाषांतर करण्यासाठी या शब्दाचा एक विशेष शब्द म्हणून अनुवाद केला जाऊ शकतो. हे समजल्याची खात्री करा की ह्याला एक लाक्षणिक किंवा आध्यात्मिक अर्थ आहे. * "मुल म्हणून अनुभव स्वीकारणे" हा वाक्यांशाचा "परमेश्वराकडून मुल म्हणून स्वीकारले जाणे" किंवा "परमेश्वराचे मुल (आध्यात्मिक) बनणे" म्हणून अनुवाद केला जाऊ शकतो. * "मुलांना दत्तक घेण्याची प्रतीक्षा करणे" ह्याचा अनुवाद "परमेश्वराचे मुल बनण्याकडे पाहणे" किंवा "परमेश्वर मुल म्हणून आपला स्वीकार करील या अपेक्षेने वाट पाहणे" असे भाषांतर केले जाऊ शकते. * "त्यांना दत्तक घेणे" या शब्दाचे भाषांतर "त्यांना स्वत: च्या मुलांसारखे स्वीकारणे" किंवा "त्यांना स्वतःची (आध्यात्मिक) मुले बनवणे" म्हणून केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहा: [वारस](../other/heir.md), [वारसा](../kt/inherit.md), [आत्मा](../kt/spirit.md)) ## पवित्र शास्त्रामधील संदर्भ: * [इफिसकरांस पत्र 01:5-6](rc://*/tn/help/eph/01/05) * [गलतीकरांस पत्र 04:3-5](rc://*/tn/help/gal/04/03) * [रोमकरास पत्र 08:14-15](rc://*/tn/help/rom/08/14) * [रोमकरास पत्र 08:23-25](rc://*/tn/help/rom/08/23) * [रोमकरास पत्र 09:3-5](rc://*/tn/help/rom/09/03) * Strong's: G5206