वेदी एक उभारलेली रचना होती ज्याच्या वर इस्राएल लोक देवाला प्राणी आणि धान्ये अर्पण करत.
* पवित्र शास्त्राच्या काळात, बऱ्याचदा साध्या सोप्या वेद्या मातीला दाबून मातीचा ढिगारा बनवून किंवा स्थिर ढिग तयार करण्यासाठी मोठ मोठे दगड एकमेकांवर ठेवून बनवल्या जात.
* सोने, पितळ किंवा कांस्य धातूने आच्छादलेल्या काही विशिष्ट पेटीच्या आकाराच्या वेद्या लाकडाने बनविल्या होत्या.
* इस्राएळ लोकांच्या जवळ राहणाऱ्या इतर लोकांच्या गटांनीही आपल्या दैवतांना बलिदान अर्पण करण्यासाठी वेद्या बांधल्या.
* नोहा तारवाबाहेर आल्यानंतर,त्याने __वेदी__ बांधली व अर्पणासाठी वापरल्या जाणा-या प्राण्यांपैकी प्रत्येक प्रकारातुन काही प्राण्यांचे देवाला होमार्पण केले.
* जेंव्हा ते होमार्पणाच्या ठिकाणी जेंव्हा पोहोचले तेंव्हा अब्राहामाने आपला पुत्र इसहाक यास बांधले व __वेदीवर__ ठेविले.
* याजक त्या पशूस मारून त्याचे __वेदीवर__ होमार्पण करत असे.
* मुर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळत्याने जीवंत देवासाठी एक नवीन __वेदी__ बांधली व त्यावर देवाला पशूबली अर्पण केला.