mr_tw/bible/kt/adultery.md

40 lines
5.8 KiB
Markdown
Raw Normal View History

2019-07-02 14:52:13 +00:00
# व्यभिचार, व्यभिचारी, व्याभिचारिणी,
2018-08-14 03:00:16 +00:00
2019-07-02 14:52:13 +00:00
## व्याख्या:
2018-08-14 03:00:16 +00:00
"व्यभिचार" या शब्दाचा संदर्भ अशा पापाशी आहे जे एखाद्या विवाहित व्यक्तीचा लैंगिक संबंध अशा व्यक्तीशी होतो, जी त्याची पती किंवा पत्नी नाही. ते दोघेही व्यभिचाराचे दोषी आहेत. "व्यभिचारी" हा शब्द अशा प्रकारची वागणूक किंवा अशा कोणत्याही व्यक्तीचे वर्णन करतो जे हे पाप करतात.
* "व्यभिचारी" हा शब्द व्यभिचार करणा-या कोणत्याही व्यक्तीस सहसा वापरला जातो.
* कधीकधी "व्यभिचारिणी" हा शब्द व्यभिचार करणारी एक स्त्री होती हे दर्शविण्यासाठी वापरला जातो.
* पती-पत्नीने लग्नाच्या करारामध्ये एकमेकांबद्दल केलेल्या आश्वासनांना व्याभिचार तोडून टाकतो.
* तुम्ही व्यभिचार करू नये अशी इस्राएलांना परमेश्वराने आज्ञा दिली आहे.
* "व्यभिचारी" हा शब्द लाक्षणिक अर्थाने इस्राएल लोकांचे परमेश्वराबद्दल अविश्वासू असल्याचे वर्णन करण्यात आले आहे, खासकरून जेव्हा ते खोट्या देवांची उपासना करायचे तेव्हा.
2019-07-02 14:52:13 +00:00
## भाषांतर सूचना
2018-08-14 03:00:16 +00:00
* लक्ष्यित भाषेमध्ये "व्यभिचार" असा अर्थ असलेला एकही शब्द नसल्यास या पदांचा "दुसऱ्या कोणाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे" किंवा "दुसऱ्या व्यक्तीच्या जोडीदाराशी निकटचा संबंध असणे" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
* काही भाषेत व्यभिचाराबद्दल बोलण्याचा एक अप्रत्यक्ष मार्ग असू शकतात, जसे की "कोणाच्या तरी पतीच्या सोबत्याशी झोपणे" किंवा "एखाद्याच्या बायकोशी विश्वासघात करणारा". (पहा: [युफोमिसम](rc://mr/ta/man/translate/figs-euphemism)
* जेव्हा "व्यभिचारी" शब्दाचा अर्थ लावला जातो तेव्हा, अविश्वासू पतीशी तुलना करून परमेश्वराची आज्ञा न मानणाऱ्या लोकांबद्दल परमेश्वराच्या दृष्टिकोनाचा संवाद साधण्यासाठी त्याचे शब्दशः भाषांतर करणे चांगले असते. हे लक्षित भाषेमध्ये अचूकपणे सांगत नसल्यास, "व्यभिचारी" शब्दाच्या भाषांतरासाठी लाक्षणिक अर्थाचा वापर "अविश्वासू" किंवा "अनैतिक" किंवा "अविश्वासू पतीप्रमाणे" असा केला जाऊ शकतो.
(हे सुद्धा पहा: [वचनबद्ध](../other/commit.md), [करार](../kt/covenant.md), [लैंगिक अनैतिकता](../other/fornication.md), [दुसऱ्याबरोबर झोपणे](../other/sex.md), [विश्वासू](../kt/faithful.md))
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
2018-08-14 03:00:16 +00:00
* [निर्गम 20:12-14](rc://mr/tn/help/exo/20/12)
* [होशे 04:1-2](rc://mr/tn/help/hos/04/01)
* [लुक 16:18](rc://mr/tn/help/luk/16/18)
* [मत्तय 05:27-28](rc://mr/tn/help/mat/05/27)
* [मत्तय 12:38-40](rc://mr/tn/help/mat/12/38)
* [प्रकटीकरण 02: 22-23](rc://mr/tn/help/rev/02/22)
2019-07-02 14:52:13 +00:00
## पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:
2018-08-14 03:00:16 +00:00
* __[13:06](rc://mr/tn/help/obs/13/06)__ तू __व्यभिचार__ करू नकोस.
* __[28:02](rc://mr/tn/help/obs/28/02)__ __व्यभिचार__ करु नकोस.
* __[34:07](rc://mr/tn/help/obs/34/07)__ धार्मिक पुढा-याने अशी प्रार्थना केली, ‘‘हे देवा, मी तुला धन्यवाद देतो की मी अन्य मनुष्यांसारखा पापी नाही. जे चोरी, अन्याय, __व्यभिचार__ करतात त्यांच्याप्रमाणे मी नाही, व हया जकातदारासारखाही नाही.”
2019-07-02 14:52:13 +00:00
# Strong's
2018-08-14 03:00:16 +00:00
* Strong's: H5003, H5004, G3428, G3429, G3430, G3431, G3432