# सर्व देवाचे प्रिय, जे रोम मध्ये आहेत ज्यांना पवित्रजन होण्याचा पाचारण करण्यात आले आहे एक नवीन वाक्य आणि कर्तरी क्रियापदाने ह्याचे भाषांतर करता येते: ‘’ रोम मध्ये तुम्ही जे सर्व आहात त्यांना मी हे पत्र लिहित आहे ज्यांच्यावर देवाचे प्रेम आहे आणि त्याचे लोक होण्याकरिता त्याने निवडले आहे.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी) # तुम्हास कृपा व शांती असो ह्याचे एका नवीन वाक्यात भाषांतर करता येते: ‘’कृपा व शांती तुम्हास असो.’’