येशू त्याच्या बारा प्रेषितांना त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल येथे सुरु होतो. # त्याने त्याच्या बारा शिष्यांना एकत्र बोलाविले "त्याच्या बारा शिष्यांना त्याच्याजवळ बोलाविले" # त्यांना अधिकार दिला ह्याची खात्री करा की त्याचा अधिकार हा १) अशुद्ध आत्म्यांना काढून टाकणे आणि २) रोग व आजार बरे करणे ह्यासाठी होता हे मजकूर स्पष्टपणे संप्रेषित करतो. # काढून टाकणे "अशुद्ध आत्म्यांना सोडून जाण्यांस सांगणे" # सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी "प्रत्येक रोग व प्रत्येक दुखणी." "रोग आणि "दुखणी" हे दोन शब्द घनिष्ट संबंधित आहेत परंतु शक्यतो ते दोन वेगळे शब्द आहेत असे त्यांचे भाषांतर केले पाहिजे. "रोगामुळे" एखादा व्यक्ती आजारी पडतो. "आजार" हा रोगामुळे आलेली शारीरिक दुर्बलता आणि दुखणे होय.