# तुमच्याकरिता "तुमच्या कल्याणासाठी" # शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये "पवित्र शास्त्रामध्ये जे कांही लिहिले आहे त्याच्या विरुद्ध जाऊ नका." (TFT) # तुमच्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये निराळेपण कोण पाहात आहे? पौल येथे करिंथकरांची कानउघाडणी करीत आहे कारण त्यांचा असा समज आहे की त्यांनी पौल किंवा अपुल्लोस द्वारे सुवार्तेवर विश्वास ठेवला म्हणून ते इतरांपेक्षा चांगले आहेत. AT: "तुम्ही इतर मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ नाही." (पाहा:अलंकारयुक्त प्रश्न) # जे तुझ्याजवळ आहे ते तुला फुकट दिले नाही काय? त्यांच्याजवळ जे आहे ते त्यांना देवाने फुकट दिले आहे ह्यावर पौल भर देत आहे. AT: "तुमच्या जवळ जे कांही आहे ते देवाने तुम्हांला दिले आहे!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न). # जणू काय तुम्ही हे केले याचा तुम्ही अभिमान का बाळगता? त्यांना जे प्राप्त झाले होते त्याबद्दल ते अभिमान बाळगत होते म्हणून पौल त्यांची खरडपट्टी काढीत होता, AT: "तुम्हांला अभिमान बाळगण्याचा अधिकार नाही." किंवा "अभिमान बाळगुच नका." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न).