# अनेसिम हे एका पुरुषाचे नाव आहे. (पहा: नावांचे भाषांतर) # माझे लेकरू अनेसिम ‘’माझा पुत्र अनेसिम.’’ पौलाने त्याच्या आणि अनेसिमच्या जवळच्या नात्याची तुलना एक वडील आणि पुत्र अशी केली आहे. अनेसिम हा खरा त्याचा मुलगा नव्हता, पण जेव्हा पौलाने त्याला येशुबद्द्ल शिकवले तेव्हा त्याला अध्यात्मिक जीवन मिळाले, आणि पौलाने त्यावर प्रेम केले. ह्याचे भाषांतर ‘’माझा प्रिय मुलगा अनेसिम’’ किंवा ‘’माझा अध्यात्मिक पुत्र अनेसिम’’ असे करता येते. (पहा: रूपक अलंकार) # ज्याला मी अध्यात्मिक जन्म दिला ह्याचे भाषांतर ‘’जो माझ्यासाठी एक मुलगा झाला’’ किंवा ‘’जो माझ्यासाठी मुलासारखा झाला.’’ अनेसिम कशा अर्थाने पौलाचा मुलगा झाला हे उघड आहे: ‘’जो माझा मुलगा झाला जेव्हा मी त्याला येशुबद्द्ल शिकवले आणि त्याला नवीन जीवन मिळाले.’’ (पहा: उघड आणि पूर्ण) # मी बंधनात असता ‘’माझ्या बेड्यात’’ ह्याचे भाषांतर ‘’मी तुरुंगात असताना.’’ तुरुंगातील बेड्यांनी बांधलेले असायचे. अनेसिम ला शिकवले तेव्हा पौल तुरुंगात होता, आणि हे पत्र लिहिताना तो अजूनही तुरुंगातच होता. (पहा: अजहल्लक्षण अलंकार) # तो पूर्वी तुला निरुपयोगी होता ह्याचे भाषांतर एक नवीन वाक्य म्हणून करता येते:’’तो निरुपयोगी होण्याच्या आधी.’’ # तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे ‘’पण तो आता उपयोगी आहे.’’ भाषांतरकार ह्याला एक टीप म्हणून घालू शकतात ‘’अनेसिम ह्या नावाचा अर्थ म्हणजे ‘फायदेशीर’ किंवा ‘उपयोगी.’ ‘’ # त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे ‘’मी अनेसिमला परत तुमच्याकडे पाठवले आहे.’’ अनेसिमला पाठवण्या आधी पौल हे पत्र लिहत असल्याने,त्याचे भाषांतर ‘मी त्याला परत तुमच्याकडे पाठवत आहे असे करता येते.’’ (युडीबी) # माझ्या मनात होते येथे ‘मन’ हा शब्द ज्यावर खूप प्रेम केले गेले आहे त्यासाठी वापरला जातो. त्या वाक्यांशाचे भाषांतर ‘’ज्यावर मी खूप मनापासून प्रेम करतो.’’ पौल हे अनेसिमच्या बद्दल म्हणत होता. (पहा: अजहल्लक्षण अलंकार) # त्याला जवळ ठेवण्याचे एक नवीन वाक्य म्हणून ह्याचे भाषांतर करता येते: ‘’मी तर त्याला माझ्याबरोबर ठेवले असते’’ # ज्याला मी ठेवला असते ‘’तुम्ही इथे नसल्याने, त्याने मला मदत करावी.’’एक वेगळे वाक्य म्हणून देखील ह्याचे भाषांतर करता येते: ‘तुझ्या ऐवजी तो मला मदत करत होता’’ # तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून # मी बंधनात पडलो ह्याचे भाषांतर ‘’मी तुरुंगात असताना’’ किंवा ‘’मी तुरुंगात असल्याने.’’ # सुवार्तेमुळे इकडे त्याचे भाषांतर ‘’मी सुवार्तेची घोषणा करतो म्हणून.’’