# मी आपल्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करितो व आपल्या देवाची उपकारस्तुती करतो ‘’जेव्हा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, मी नेहमीच देवाचे आभार मानतो (युडीबी) # मी, पौल ह्याने हे पत्र लिहिले ‘’मी’’ आणि ‘’माझे’’ ह्या पत्रातील शब्द पौलाशी सबंधीत आहेत. # तू येथे आणि पत्रात, ‘’तू’’ ह्या शब्दाचा संदर्भ फिलेमोनाशी आहे. (पहा: तू चे स्वरूप) # त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफल व्हावे ह्याचे भाषांतर ‘’आम्ही करतो तसा ख्रीस्तावरचा तुमचा विश्वास तुम्हाला ओळखण्यास मदत करतील’’ किंवा ‘’ख्रिस्ताचा सहभागी होण्यास तुम्ही आमच्यात एकत्र झाला म्हणून, तुम्हाला हे कळेल’’ # तुझ्या विश्वासाचे भागीपण ‘’आम्ही करतो तसाच तुम्ही देखील ख्रिस्तावर विश्वास ठेवता’’ (युडीबी) # जे ख्रिस्तात आहे ह्याचा सर्वात स्वाभाविक अर्थ ‘’ख्रिस्तामुळे जे आपल्याकडे असते.’’ # तुझ्याकडून पवित्र जनांच्या जिवाला विश्रांती मिळाली आहे इकडे ‘’जिवाला’’ ह्याचा संदर्भ सर्व विश्वासणाऱ्या लोकांच्या धाडसाशी आहे. ‘’विश्रांती मिळाली आहे’’ हे एक कर्मणी पोटवाक्य आहे. ह्याचे भाषांतर एक कर्तरी पोटवाक्य म्हणून करता येते: ‘’तुम्ही विश्वास्नार्यांना उत्तेजन दिले आहे.’’ (पहा: अजहल्लक्षण अलंकार आणि कर्तरी किंवा कर्मणी) # बंधो पौलाने फिलेमोनाला ‘’बंधू’’ असे म्हंटले कारण ते दोघेही विश्वासणारे होते. तो देखील त्यांच्या मैत्रीवर भर देत होता. ह्याचे देखील भाषांतर इकडे ‘’प्रिय बंधू’’ किंवा ‘’प्रिय मित्र’’ असे करता येते.