# तुझ्या पापांची क्षमा झाली आहे ‘’तुझी क्षमा झाली आहे.’’ एका कृतीशील क्रियापदाने ह्याचे प्रदर्शन करता येते: ‘’मी तुमच्या पापांची क्षमा करतो.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी) # तुझ्या विश्वासाने तुझे तारण झाले ‘’तुझ्या विश्वासामुळे, तू तारिला गेली.’’ ‘’विश्वासाची’’ ही कल्पना त्याचे भाषांतर एका क्रियापदाने करता येते: ’’तू विश्वास ठेवला म्हणून, तुझे तारण झाले आहे.’’ # शांतीने जा ‘’निरोप’’ घेण्याची आणि त्याच वेळी आशीर्वाद देण्याची ही पद्धत आहे. ह्याचे भाषांतर ‘’तू जात असताना, अजिबात काळजी करू नको’’ किंवा ‘’तू जात असताना देवाने तुला शांती द्यावी’’ (युडीबी)