# (लूक, ह्या पुस्तकाचा लेखक, लोकांनी येशू आणि योहान ह्यांना कसा प्रतिसाद दिला त्यावर टिप्पणी देत आहे.) # देव नीतिमान आहे अशी घोषणा त्यांनी केली ‘’ते म्हणतात की देवाने स्वतःला नीतिमान असे दाखवले’’ किंवा ‘’देवाने नीतीने कृती केली अशी त्यांनी घोषणा केली’’ # ज्याचा योहानाच्या बाप्तीसम्याने बाप्तिस्मा झाला ‘’ज्याचा बाप्तिस्मा योहानाने केला’’ # ज्यांचा बाप्तिस्मा त्याने केला नाही ‘’ज्यांना योहानाने बाप्तिस्मा दिला नाही’’ किंवा ‘’योहानाने बाप्तिस्मा देण्यास ज्यांनी नकार दिला होता’’ किंवा ‘’ज्यांनी योहानाचा बाप्तिस्मा नाकारला’’ # त्यांच्यासाठी देवाचा सल्ला ‘’ त्यांच्यासाठी देवाचा उद्देश’’ किवा ‘’त्यांच्यासाठी देवाची योजना’’ किंवा ‘’त्यांनी काय करावे अशी देवाची इच्छा होती’’ # स्वतःसाठी त्यांनी देवाचा सल्ला नाकारला ‘’देवाने त्यांनाजे सांगितले त्याची अवज्ञा करण्याचे त्यांनी निवडले’’ किंवा ‘’देवाच्या इच्छेवर विश्वास न ठेवण्याचे त्यांनी निवडले’’ # ज्यांचा बाप्तिस्मा त्यांनी केला नाही, स्वतःसाठी त्यांनी देवाचा सल्ला नाकारला त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा नाकारला म्हणून, अध्यात्मिक रीतीने ते देवाची त्यांच्यासाठी काय इच्छा होती ते स्वीकारण्यास तयार नव्हते असे दिसते.