# आता येथे कथेच्या नवीन भागाची सुरूवात होते # त्या सुमारास यहूदीयातील बंधुजनांना मदत करण्यासाठी जेव्हा अंत्युखियातील विश्वासणाऱ्यांनी पैसे पाठविले तेव्हा. # त्यांच्यावर हात टाकला "अटक करण्यासाठी शिपायांना पाठविले" किंवा "त्यांना अटक करून तुरुंगांत टाकण्यासाठी शिपायांना पाठविले." (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा) # मंडळीतल्या कांही जणांस हे संदर्भांद्वारे स्पष्ट होते की ते मंडळीतील पुढारी होते. त्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते, "मंडलीतील पुढारी" किंवा "विश्वासणाऱ्यांच्या गटातील पुढारी" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट माहिती) # त्यांना गैर वागणूक द्यावी म्हणून "विश्वासणाऱ्यांना छळावे म्हणून" # त्याने जिवे मारले "हेरोद राजाने जिवे मारले" किंवा "हेरोद राजाने जिवे मारण्याचा हुकुम दिला" # त्याने योकोबाला...तरवारीने जिवे मारले याकोबाला कशाप्रकारे मारले ह्याचे हे स्पष्टीकरण होते.