# प्रकटीकरण 16 सामान्य माहिती ## स्वरूप आणि संरचना हा अधिकार 15 व्या अधिकारातील दृष्टांत पुढे सुरु ठेवतो. एकत्रितपणे ते सातव्या पिडेला देतात जेणेकरून देवाचा क्रोध पूर्ण होतो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/wrath]]) काही भाषांतरे वाचण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून पद्याची प्रत्येक ओळ ही इतर मजकुरापेक्षा अधिक उजवीकडे ठेवतात. युएलटी ने हे 5-7 वचनात केले आहे. ## या अधिकारातील विशेष संकल्पना ### “मंदिरातून एक मोठी वाणी मी ऐकली” हे तेच मंदिर आहे ज्याच्या उल्लेख 15 व्या अधिकारात केला गेला. ### देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या हा अधिकार तीव्र न्याय प्रगट करतो. देवदूत देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या ओततो असे त्याचे चित्रण केलेले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) ## या अधिकारातील भाषांतराच्या इतर शक्य अडचणी या अधिकाराचा स्वर वाचकांना आश्चर्यचकित करण्याकडे आहे. भाषांतर करतेवेळी या अधिकारात व्यक्त केलेली स्पष्ट भाषा कमी करता कामा नये. ### हर्मगीदोन हा एक इब्री शब्द आहे.हे एका जागेचे नाव आहे. योहान इब्री शब्दाच्या आवाजाचा वापर करतो आणि त्याला ग्रीक शब्दात लिहितो. भाषांतरकारांनी त्याचे भाषांतर लक्षित भाषेतील अक्षरांनी करावे म्हणून त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-transliterate]])