# प्रकटीकरण 12 सामान्य माहिती ## स्वरूप आणि संरचना काही भाषांतरे वाचण्यास सुलभ व्हावे म्हणून पद्याची प्रत्येक ओळ मजकुराच्या अधिक उजवीकडे ठेवतात. युएलटी ने हे 10-12 वचनात केले आहे. ## या अधिकारातील विशेष संकल्पना ### अजगर प्रकटीकरणाचे पुस्तक जुन्या करारामधून प्रतिमांचा वापर करते. उदाहरणार्थ, योहान सैतानाला अजगर म्हणून संदर्भित करतो. ही प्रतिमा एदेन बागेच्या संदर्भातून येते, जेव्हा सैतानाने हव्वेला मोहात पाडले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) ## या अधिकारातील भाषांतराच्या इतर शक्य अडचणी ### “स्वर्गात एक मोठे चिन्ह पाहण्यात आले” येथे कर्मणी प्रयोगाचा वापर करून योहान हे सांगत नाही की ते मोठे चिन्ह कोणी बघितले. जेव्हा विषय अस्पष्ट असतो तेव्हा जर तुमच्या भाषेत कर्मणी प्रयोग नसेल तर भाषांतर करणे अवघड जाते. अनेक इंग्रजी भाषांतरे येथे भूतकाळाचा वापर करतात आणि म्हणतात “स्वर्गात एक मोठे चिन्ह प्रगत झाले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/writing-apocalypticwriting]])