# प्रकटीकरण 05 सामान्य माहिती ## संरचना आणि स्वरूप काही भाषांतरांनी पद्द्याची प्रत्येक ओळ ही उरलेल्या मजकुरापेक्षा अधिक उजवीकडे वाचण्यासाठी सुलभ व्हावी म्हणून ठेवलेली आहे. युएलटी ने हे 9-13 वचनांमध्ये केले आहे. ## या अधिकारातील विशेष संकल्पना ### सीलबंद गुंडाळी योहानाच्या काळात राजे आणि महत्वाचे लोक महत्वाची कागदपत्रे कागदाच्या मोठ्या तुकड्यावर किंवा प्राण्यांच्या कातड्यावर लिहित असत. नंतर ते त्याची गुंडाळी करून त्याला मेणाने बंद करत असत जेणेकरून ते तसेच राहील. ज्या व्यक्तीला उद्देशून ते कागदपत्र लिहिले आहे फक्त त्यालाच ते सील तोडून गुंडाळी उघडण्याचा अधिकार होता. या अधिकारात, “जो एक सिंहासनावर बसला होता” त्याने गुंडाळी लिहिली आहे. फक्त त्या व्यक्तीला ज्याला “यहूदाचा सिंह, दाविदाचा वंशज” आणि “कोकरा” असे म्हंटले आहे त्यालाच ती उघडण्याचा अधिकार आहे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/other/scroll]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/authority]]) ### चोवीस वडील वडील हे मंडळींचे पुढारी आहेत. चोवीस वडील हे कदाचित युगातील संपूर्ण मंडळींचे सूचक असू शकतील. जुन्या करारामध्ये इस्राएलची बारा कुळे होती आणि नवीन करारामध्ये बारा प्रेषित होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-apocalypticwriting]]) ### ख्रिस्ती प्रार्थना ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थनेचे वर्णन धूप असे केले आहे. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना देवाला सुगंध अशा आहेत. जेव्हा ख्रिस्ती लोक प्रार्थना करतात तेव्हा तो प्रसन्न होतो. ### देवाचे सात आत्मे हे आत्मे [प्रकटीकरण 1:4](../01/प्रक/01/04.md) मधील सात आत्मे आहेत. ## या अधिकारातील महत्वाचे अलंकार ### रूपक ”यहूदाचा वंशाचा सिंह” आणि “दाविदाचा वंशज” हे रूपक आहेत जे येशूला संदर्भित करतात. येशू यहूदाच्या कुळातून आणि दाविदाच्या कुटुंबातून आला होता. सिंह हे भयानक आहेत, आणि सर्व प्राणी आणि मनुष्य त्यांना घाबरतात, म्हणून ते राजासाठी ज्याचे सर्वजण ऐकतात त्यासाठी एक रूपक आहे. “दाविदाचा वंश” हे शब्द इस्राएलचा राजा दावीद याच्याबद्दल सांगते जसे की, तो एक बी आहे ज्याला देवाने लावले होते आणि येशू हा जसा की, एक मूळ आहे जे त्या बीमधून वाढत गेले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])