# Where is he who was born King of the Jews? ताऱ्यांचा अभ्यास करून त्या लोकांना माहित झाले की जो राजा होणार आहे तो जन्मला आहे. तो कोठे आहे याचा ते शोध घेत होते. वैकल्पिक भाषांतर: “एक बाळ जे यहूद्यांचा राजा होईल त्याचा जन्म झाला आहे. तो कोठे आहे?” # his star ते हे म्हणत नव्हते की ते बाळ त्या ताऱ्याचे खरे मालक होते. वैकल्पिक भाषांतर: “तो तारा जो त्याविषयी सांगतो” किंवा “तो तारा जो त्याच्या जन्माशी निगडीत आहे” # in the east जसा तो पूर्वेकडे उदयास आला किंवा “जेव्हा आम्ही आमच्या देशामध्ये होतो” # worship संभाव्य अर्थ 1)दैवी समजून त्या बाळाची आराधना करण्याचा त्यांचा हेतू, किंवा 2) त्या बाळाचा मानवी राजा म्हणून आदर करण्याचा होता. जर तुमच्या भाषेमध्ये दोन्ही अर्थाचे शब्द असतील, तर तूम्ही त्यांचा या ठिकाणी उपयोग करू शकता.