# कलस्सैकरांस पत्राची ओळख ## भाग 1: सामान्य परिचय ### कलस्सैकरांस पुस्तकाची रूपरेषा. शुभेच्छा, आभार मानणे आणि प्रार्थना (1: 1-12) 1. ख्रिस्ताचे व्यक्तित्व आणि कार्य - सुटका आणि पापमुक्ती (1: 13-14) - ख्रिस्त: अदृश्य देवाची प्रतिमा आणि जो सर्व सृष्टीवर आहे (1: 15-17) - ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे आणि मंडळी त्याचावर विश्वास ठेवते (1: 18-2: 7) 1. विश्वासणाऱ्यांची कसोटी - खोट्या शिक्षकांविरुद्ध चेतावणी (2: 8-19) - खरी धार्मिकता कठोर नियम आणि न झुकणारी परंपरा नाही (2: 20-23) 1. शिक्षण आणि राहणीमान - ख्रिस्तामधील जीवन (3: 1-4) - जुने आणि नवीन जीवन (3: 5-17) - ख्रिस्ती कुटुंब (3: 18-4: 1) 1. ख्रिस्ती वर्तन (4: 2-6) 1. समारोप आणि शुभेच्या - पौल तुखिक आणि ओनेसिम (4: 7-9) - धन्यवाद. – पौल आपल्या सहयोगींकडून शुभेच्या पाठवतो (4: 10-14) - पौल आर्किस्पस आणि लावदेकिया येथील ख्रिस्ती लोकांना निर्देश देतो (4: 15-17) ) - पौलाचे वैयक्तिक अभिवादन (4:18) ### कलस्सैकरांचे पुस्तक कोणी लिहिले? पौलाने कलस्सैकरांस पुस्तकाचे लिखाण केले. पौल तार्सास शहरापासून होता. त्याच्या सुरुवातीच्या काळात शौल म्हणून त्याला ओळखले गेले होते. ख्रिस्ती बनण्यापूर्वी, पौल एक परुशी होता. त्याने ख्रिस्ती लोकांचा छळ केला. ख्रिस्ती झाल्यानंतर त्याने अनेक वेळा रोम साम्राज्यात लोकांना येशूविषयी सांगितले. रोममध्ये तुरुंगात असताना पौलाने हे पत्र लिहिले. ### कलस्सैकरांस पुस्तक काय आहे? पौलाने हे पत्र कलस्सै येथील आशिया मायनर शहरात विश्वासणाऱ्यांना लिहिले होते. या पत्राचा मुख्य हेतू खोटे शिक्षकांविरुद्ध सुवार्तेचे रक्षण करणे हा होता. त्याने हि गोष्ट येशूला देवाची प्रतिमा, सर्व गोष्टी सांभाळणारे आणि चर्चचे प्रमुख अशी स्तुति करून हे केली. त्यांना हे समजावे अशी पौलाची इच्छा होतो की केवळ देवाने त्यांना स्वीकारण्यासाठी ख्रिस्तच आवश्यक आहे. ### या पुस्तकाचे शीर्षक कसे भाषांतरित करावे? भाषांतरकार या पुस्तकास त्याच्या पारंपारिक शीर्षकाद्वारे बोलावणे निवडू शकतात, ""कलस्सै."" किंवा ""कलस्सै येथील मंडळीला पौलाचे पत्र"" किंवा ""कलस्सै येथील ख्रिस्ती लोकांसाठी पत्र"" यासारखे ते एक स्पष्ट शीर्षक निवडू शकतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) ## भाग 2: महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना ### कलस्सै येथील मंडळीमध्ये कोणत्या धार्मिक समस्या होत्या? कलस्सै येथील मंडळीमध्ये खोटे शिक्षक होते. त्यांचे अचूक शिक्षण अज्ञात आहे. परंतु त्यांनी कदाचित आपल्या अनुयायांना देवदूतांची उपासना करण्यास आणि धार्मिक उत्सवांबद्दल कठोर नियमांचे पालन करण्यास शिकवले असेल. त्यांनी कदाचित असे शिकवले असावे की एखाद्या व्यक्तीची सुंता करावी आणि काही विशिष्ट प्रकारचे अन्न खावे. पौलाने म्हटले की या खोट्या शिकवणी मनुष्यापासून आल्या आहेत देवापासून नाहीत. ### पौलाने स्वर्ग आणि पृथ्वीची प्रतिमा कशी वापरली? या पत्रात, पौलाने वारंवार स्वर्गाविषयी ""उपरोक्त"" बोलले. त्याने पृथ्वीपासून ते वेगळे केले, जे शास्त्रवचना ""खाली"" असल्याचे बोलते. या प्रतिमेचा उद्देश ख्रिस्ती लोकांना वरच्या स्वर्गात राहणारा देव सन्मानित करण्याचा मार्ग शिकवण्याचा होता. पृथ्वी किंवा भौतिक जग वाईट आहे असे पौल शिकवत नाही. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/evil]]) ## भाग 3: महत्त्वपूर्ण अनुवाद समस्या ### ""पवित्र"" आणि ""शुद्ध"" हि कल्पना कलस्सैमध्ये यूएलटीमध्ये कशी दर्शविली जाते? शास्त्रवचनांमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही कल्पनांना सूचित करण्यासाठी असे शब्द वापरले आहेत. या कारणास्तव, भाषांतरकारांना त्यांच्या आवृत्त्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व करणे कठीण आहे. कलस्सैमध्ये हे शब्द सामान्यत: ख्रिस्ती लोकांना दिलेल्या कोणत्याही विशिष्ट भूमिकेशिवाय एक साधा संदर्भ दर्शवतात. त्यामुळे यूएलटी मधील कलस्सैमधील ""विश्वासणारे"" किंवा ""जे त्याच्यावर विश्वास ठेवतात"" याचा वापर करतात. (पहा: 1: 2, 12, 26) ### येशूची निर्मिती झाली किंवा तो सार्वकालिक आहे? येशू एक निर्मिती नव्हता परंतु नेहमीच देव म्हणून अस्तित्वात होता. येशू देखील मनुष्य बनला. कलस्सैकरांस पत्र 1:15 मध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे जिथे तो म्हणतो की ""सर्व सृष्टीचे ज्येष्ठ पुत्र"" आहे. या विधानाचा अर्थ आहे की सर्व निर्मितीवर येशू प्रभावी आहे. याचा अर्थ असा नाही की तो देवाने निर्माण केलेली पहिली गोष्ट आहे. भाषांतरकारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे की येशू एक निर्मिती आहे. ### ""ख्रिस्तामध्ये"", ""प्रभूमध्ये"" या शब्दाचा अर्थ पौल काय म्हणतो?? पौल याचा विचार व्यक्त करण्यासाठी ख्रिस्त आणि विश्वासणाऱ्यांशी एक खूप जवळचे नाते असल्याचे दर्शवितो. या प्रकारच्या अभिव्यक्तीबद्दल अधिक माहितीसाठी रोमकरांसच्या पुस्तकाचा परिचय पहा. ### कलस्सैकरांस पुस्तकातील मजकुरात कोणत्या अडचणी आहेत? पुढील अध्यायांसाठी, पवित्र शास्त्राच्या काही आधुनिक आवृत्त्या जुन्या आवृत्त्यांपेक्षा वेगळे आहेत. यूएलटी मजकुरात आधुनिक वाचन आहे आणि जुने वाचन तळटीपमध्ये ठेवले गेले आहे. जर सामान्य भाषेत पवित्र शास्त्राचा अनुवाद अस्तित्वात असेल तर भाषांतरकारांनी त्या आवृत्तीत सापडलेली वाचन वापरण्याचा विचार करावा. जर नसेल तर भाषांतरकारांना आधुनिक वाचन करण्याची शिफारस केली जाते. * ""आपला देव पिता ह्याजकडून तुम्हास कृपा व शांती असो"" (1: 2). काही जुन्या आवृत्त्यांमध्ये अधिक वाचन होते: "" देवपिता आणि प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि शांति तुम्हांबरोबर असो."" * ""एपफ्रास, आमच्या प्रिय साथी सेवक, जो आमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे"" (1: 7 ). काही जुन्या आवृत्त्या ""आपल्यासाठी"" वाचतात: ""एपफ्रास, आमचा प्रिय सहकारी सेवक, जो तुमच्यासाठी ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे."" * ""पिता, ज्याने तुम्हाला विश्वासणाऱ्यांच्या वारशातभाग घेण्यास सक्षम केले आहे"" (1:12). काही जुन्या आवृत्त्या वाचतात, ""पित्याने, ज्याने आम्हाला वारसा वाटून घेण्यास पात्र केले आहे."" * ""त्याच्या पुत्रामध्ये आम्हाला मोबदला आहे"" (1:14). काही जुन्या आवृत्त्या वाचतात, ""त्याच्या पुत्रामध्ये त्याच्या रक्ताद्वारे मोबदला आहे."" * ""आणि आमच्या सर्व दोषांची क्षमा केली"" (2:13). काही जुन्या आवृत्त्या वाचतात: ""आणि आपल्या सर्व पापांची क्षमा केली."" * ""जेव्हा ख्रिस्त जो तुमचे जीवन आहे तो प्रकट होईल"" (3: 4). काही जुन्या आवृत्त्या वाचतात, ""जेव्हा ख्रिस्त जो तुमचे जीवन आहे प्रकट होईल."" * ""देवाची आज्ञा भंग करणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येत आहे"" (3: 6). यूएलटी, यूएसटी आणि इतर अनेक आधुनिक आवृत्त्यांनी असे वाचले. तथापि, काही आधुनिक आणि जुन्या आवृत्त्या वाचतात, "" या गोष्टींमुळे देवाचा क्रोध येणार आहे."" * ""मी याबद्दल त्याला तुमच्याकडे पाठवले आहे, की आपण आमच्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेऊ शकता"" (4: 8). काही जुन्या आवृत्त्या अशा वाचतात की, ""यासाठी मी त्याला आपल्याकडे पाठविले की त्याने आपल्याविषयीच्या गोष्टी जाणून घ्याव्या."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-textvariants]])