# कलस्सैकरांस पत्र 01 सामान्य टिपा ## रचना आणि स्वरूप एका विशिष्ट पत्राप्रमाणे, पौलाने तीमथ्य आणि स्वतःची ओळख कोलोसीतील ख्रिस्ती लोकांशी 1-2 या वचनात केली. पौल या अध्यायामध्ये दोन विषयांवरती बरेच काही लिहितो: ख्रिस्त कोण आहे आणि ख्रिस्ताने ख्रिस्ती लोकांसाठी काय केले आहे. ## या अध्यायातील विशेष संकल्पना ### गुप्त सत्य या अध्यायात पौलाने ""गुप्त सत्य"" दर्शविले आहे. देवाच्या योजनांमध्ये मंडळीची भूमिका एकदा अज्ञात होती. पण देवाने आता ती उघड केले आहे. याचा अर्थ असा आहे की देवाच्या योजनांमध्ये परराष्ट्रीयांनी यहूदी लोकांशी बरोबरी साधली आहे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/reveal]]) ## या अध्यायातील महत्त्वपूर्ण अलंकर ### ख्रिस्ती जीवनासाठी प्रतिमा ख्रिस्ती जीवनाचे वर्णन करण्यासाठी पौल अनेक भिन्न प्रतिमा वापरतो. या प्रकरणात तो ""चालणे"" आणि ""फळ देणे "" या प्रतिमा वापरतो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/other/fruit]]) ## या अध्यायातील अन्य संभाव्य अनुवाद अडचणी ### विरोधाभास विरोधाभास एक खरे विधान आहे जे एखाद्या अशक्य गोष्टीचे वर्णन करते असे दिसते. वचन 24 एक विरोधाभास आहे: ""आता मी तुमच्यासाठी दु: ख भोगून आनंद करतो."" लोक जेव्हा दुःख सहन करतात तेव्हा त्यांना आनंद होत नाही. पण 25-29 वचनांत पौलाने सांगितले की त्याचा दुःख का चांगले आहे. ([कलस्सैकरांस पत्र 1:24] (../../col/01/24.md))