# 2 तीमथ्याच्या पत्राचा परिचय ## भाग 1: सामान्य परिचय ### 2 तीमथ्य पुस्तकाची रूपरेषा. पौल तीमथ्याला अभिवादन करतो आणि देवाची सेवा करत असताना कठोर परिश्रम सहन करण्यास उत्तेजन देतो (1: 1-2: 13). 1. पौलाने तीमथ्याला सामान्य सूचना दिली (2: 14-26). 1. पौलाने भविष्यातील घटनांबद्दल तीमथ्याला इशारा दिला आणि त्याला देवाची सेवा कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले (3: 1-4: 8). 1. पौल वैयक्तिक टीका करतो (4:9 -24). ### 2 तीमथ्याचे पुस्तक कोणी लिहिले? पौलने 2 तीमथ्य हे पुस्तक लिहिले. तो तार्सस शहरातून होता. त्याच्या सुरुवातीच्या काळात शौल म्हणून त्याला ओळखले गेले होते. ख्रिस्ती बनण्यापूर्वी, पौल एक परुशी होता. त्याने ख्रिस्ती लोकाचा छळ केला. तो एक ख्रिस्ती बनल्यानंतर, त्याने रोम साम्राज्यात अनेक वेळा प्रवास केला आणि लोकांना येशूविषयी सांगितले. पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या दुसरे पत्र हे पुस्तक आहे. तीमथ्य त्याचे शिष्य आणि जवळचा मित्र होता. रोममधील तुरुंगात असताना पौलाने हे पत्र लिहिले. हे पत्र लिहिल्यानंतर पौल लवकरच मरण पावला असावा. ### 2 तीमथ्याचे पुस्तक हे कशा विषयी आहे? पौलाने तेथील विश्वासणाऱ्यांना मदत करण्यासाठी इफिस शहरात तीमथ्यला पाठीमागे सोडले होते. तीमथ्याला विविध गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पौलाने हे पत्र लिहले. त्यांनी ज्या विषयामध्ये संबोधित केले त्यामध्ये खोटे शिक्षक आणि सतत कठीण परिस्थितीबद्दल चेतावणी या बाबी समाविष्ट आहे. या पत्राने हे देखील दर्शविले आहे की पौल तीमथ्याला मंडळीमधील पुढारी म्हणून कसे प्रशिक्षित करीत आहे. ### या पुस्तकाचे शीर्षक कसे भाषांतरित केले पाहिजे? भाषांतरकार या पुस्तकास त्याचे पारंपारिक शीर्षक ""2 तीमथ्य"" म्हणू शकतात. किंवा ""द्वितीय तीमथ्य"". किंवा ते ""तीमथ्याला पौलाचे दुसरे पत्र"" किंवा ""तीमथ्याला दुसरे पत्र"" यासारखे स्पष्ट शीर्षक निवडू शकतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) ## भाग 2: महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना ### 2 तीमथ्यामध्ये सैनिक प्रतिमा काय आहे? पौल तुरुंगात लवकरच मरणार याची वाट पाहत होता हे ओळखून तो स्वत: बद्दल बोलतो जसे की तो येशू ख्रिस्ताचा एक सैनिक आहे. सैनिक त्यांच्या नेत्यांना उत्तर देतात. त्याच प्रकारे, ख्रिस्ती लोक येशूला उत्तर देतात. ख्रिस्ताचे ""सैनिक"" म्हणून, विश्वासणाऱ्यांनी ते मेले तरीदेखील त्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. ### देव शास्त्रवचने प्रेरित करतो याचा अर्थ काय आहे? देव पवित्र शास्त्रांचे खरे लेखक आहे. त्याने पुस्तके लिहिणाऱ्या मानवी लेखकांना प्रेरणा दिली. याचा अर्थ दवाने काही मार्गांनी लोक जे लिहितात ते लिहू दिले. म्हणूनच त्याला देवाचे वचन असेही म्हटले जाते. याचा अर्थ पवित्र शास्त्राविषयी अनेक गोष्टींचा अर्थ आहे. प्रथम, पवित्र शास्त्र चुकांपासून मुक्त आहे आणि त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण शास्त्रवचनांचे रक्षण करण्यासाठी किंवा ते नष्ट करणाऱ्यांकडून शास्त्रवचनांचे संरक्षण करण्यासाठी देवावर विश्वास ठेवू शकतो. तिसरे, देवाचे वचन सर्व जगाच्या भाषांमध्ये भाषांतरित केले जावे. ## भाग 3: महत्त्वपूर्ण अनुवाद समस्या ### एकवचन आणि अनेकवचन ""आपण"" या पुस्तकात ""मी"" हा शब्द पौल आहे. येथे ""आपण"" हा शब्द नेहमीच एकवचनी असावा आणि तीमथ्याला संदर्भित करतो. याचे अपवाद 4:22 आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-you]]) ### पौलाने ""ख्रिस्तामध्ये"", ""प्रभूमध्ये"" अभिव्यक्तीद्वारे काय म्हणायचे आहे? पौलाचा अर्थ ख्रिस्त आणि विश्वासणारे यांच्यात अगदी जवळचे संबंध असल्याची कल्पना होती. अधिक तपशीलांसाठी रोमकरास पत्राचा परिचय पहा. ### 2 तीमथ्याच्या पुस्तकातील मजकुरात कोणत्या मुख्य मजकूर समस्या आहेत? पुढील अध्यायांसाठी, आधुनिक आवृत्त्या जुन्या आवृत्तीत पवित्र शास्त्र भिन्न आहे. यूएलटी मजकुरात आधुनिक वाचन आहे आणि जुने वाचन तळटीपमध्ये ठेवते. जर सामान्य भाषेत पवित्र शास्त्राचा अनुवाद अस्तित्वात असेल तर भाषांतरकारांनी त्या आवृत्तीत सापडलेली वाचन वापरण्याचा विचार करावा. जर नसेल तर भाषांतरकारांना आधुनिक वाचन करण्याची शिफारस केली जाते. * ""यामुळे मला प्रचारक, प्रेषित आणि शिक्षक म्हणून नेमण्यात आले"" (1:11). काही जुन्या आवृत्त्या वाचतात, ""यामुळे मला उपदेश करणारा, प्रेषित आणि परराष्ट्रीयांना शिक्षक म्हणून नियुक्त केले गेले."" * ""देवासमोर त्यांना चेतावणी द्या"" (2:14). काही जुन्या आवृत्त्या वाचतात, ""प्रभूसमोर त्यांना चेतावणी द्या."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-textvariants]])