# 1 योहान 02 सामान्य माहिती ## या अधिकारातील विशेष संकल्पना ### ख्रिस्तविरोधक या अधिकारात योहान विशिष्ठ ख्रिस्तविरोधक आणि अनेक ख्रिस्तविरोधक या दोन्ही बद्दल लिहितो. “ख्रिस्तविरोधक” या शब्दाचा अर्थ “ख्रिस्ताचा विरोध” असा होतो. ख्रिस्तविरोधक हा एक व्यक्ती आहे जो शेवटच्या दिवसात येईल आणि येशूच्या कामाचे अनुकरण करेल, परंतु तो ते वाईटासाठी करेल. हा व्यक्ती येण्यापूर्वी तेथे अनेक लोक असतील जे ख्रिस्ताच्या विरुद्ध काम करतील; त्यांना सुद्धा “ख्रिस्तविरोधक” असे म्हंटले आहे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/antichrist]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/lastday]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/evil]]) ### रूपक येथे एकसमान रुपकांचे अनेक समूह आहेत ज्यांचा वापर या अधिकारात केला आहे. देवामध्ये असणे हे देवाबरोबर सहभागीता असणे या बद्दलचे रूपक आहे, आणि देवाचे वचन आणि सत्य लोकांमध्ये असणे हे लोकांना देवाचे वचन माहिती असणे आणि त्यांनी ते पाळणे या बद्दलचे रूपक आहे. चालणे हे वागणुकीबद्दलचे रूपक आहे, एक कुठे जात आहे हे माहित नसणे हे कसे वागावे हे माहित नसणे या बद्दलचे रूपक आहे, आणि अडखळणे हे पाप करण्याबद्दलचे रूपक आहे. प्रकाश हे काय चांगले आहे ते माहित असणे आणि तसे करणे याबद्दलचे रूपक आहे, आणि अंधार हे काय चुकीचे आहे हे माहित नसणे आणि जे चुकीचे आहे ते करणे या बद्दलचे रूपक आहे. लोकांना भलतीकडे नेणे हे लोकांना जे चूक आहे अशा गोष्टी शिकवणे या बद्दलचे रूपक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])