Edit 'tq_MRK.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
sachin_nerlekar 2023-05-25 10:39:53 +00:00
parent bd11e55ef4
commit 33fe371871
1 changed files with 315 additions and 0 deletions

315
tq_MRK.tsv Normal file
View File

@ -0,0 +1,315 @@
Reference ID Tags Quote Occurrence Question Response
1:2-3 a4zc परमेश्वर येण्यापूर्वी यशया संदेष्ट्याने काय भाकीत केले होते? परमेश्वराचा मार्ग तयार करण्यासाठी देव एक संदेश देणारा पाठवेल, जो अरण्यात कोणीतरी हाक मारतो असा आवाज येईल, असे यशयाने भाकीत केले होते.
1:4 g2v6 योहान कशाची घोषणा करण्यासाठी आला होता? योहान पाप क्षमेसाठी पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घेण्याची घोषणा करण्यास आला होता.
1:5 kdd7 योहानाकडून बाप्तिस्मा घेतल्यानंतर लोकांनी काय केले? लोकांनी त्यांच्या पापांची कबुली दिली व योहानाकडून बाप्तिस्मा घेतला .
1:6 zlqi योहानाने काय खाल्ले? योहानाने टोळ आणि अरण्यातील मध खाल्ले.
1:8 yakl योहानाने काय सांगितले की त्याच्यानंतर येणारा कशाने बाप्तिस्मा देईल? योहान म्हणाला की त्याच्यानंतर येणारा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.
1:10 y6fa योहानाकडून बाप्तिस्मा घेतल्यानंतर पाण्यातून बाहेर येताना येशूला काय दिसले? बाप्तिस्मा घेतल्यानंतर, येशूने पाहिले की आकाश उघडलेले आहे आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने त्याच्यावर उतरला आहे.
1:11 f2a4 येशूने बाप्तिस्मा घेतल्यानंतर स्वर्गातून आलेली वाणी काय म्हणाली? स्वर्गातून आलेली वाणी म्हणाली, "तू माझा परमप्रिय पुत्र आहेस; मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे."
1:12 ahm3 येशूला अरण्यात कोणी घालवून दिले? आत्म्याने येशूला अरण्यात घालवून दिले.
1:13 ex5p येशू अरण्यात किती काळ होता आणि तेथे त्याचे काय झाले? येशू चाळीस दिवस अरण्यात होता आणि त्याची तेथे सैतानाकडून परीक्षा झाली.
1:15 kyxp येशूने कोणता संदेश दिला? येशूने उपदेश केला की देवाचे राज्य जवळ आले आहे आणि लोकांनी पश्चात्ताप केला पाहिजे आणि सुवार्तेवर विश्वास ठेवला पाहिजे.
1:16 yzo9 शिमोन आणि आंद्रिया यांचा व्यवसाय काय होता? शिमोन आणि आंद्रिया हे मासे धरणारे होते.
1:17 r3ba शिमोन आणि आंद्रिया यांना काय बनवेल असे येशूने म्हटले होते? येशूने म्हटले की तो शिमोन आणि आंद्रिया यांना माणसे धरणारे बनवेल.
1:19 foqj याकोब आणि योहान यांचा व्यवसाय काय होता? याकोब आणि योहान हे मासे धरणारे होते.
1:22 lq6y येशूच्या शिकवणुकीमुळे सभास्थानातील लोकांना आश्चर्य का वाटले? येशूच्या शिकवणुकीने लोकांना आश्चर्यचकित केले कारण येशूने अधिकार वाणीने त्यांना शिकवले.
1:24 rtx4 सभागृहातील अशुद्ध आत्म्याने येशूला कोणती उपाधी दिली? सभागृहातील अशुद्ध आत्म्याने येशूला देवाचा पवित्र तो तू अशी उपाधी दिली.
1:28 dn9o येशूबद्दलची बातमीचे काय झाले? येशूबद्दलची बातमी सगळीकडे पसरली.
1:30 ii0v जेव्हा ते शिमोनच्या घरात गेले, तेव्हा येशूने कोणाला बरे केले? जेव्हा ते शिमोनच्या घरात गेले तेव्हा येशूने शिमोनच्या सासूला बरे केले.
1:32-34 ywmc संध्याकाळ झाली तेव्हा काय झाले? जेव्हा संध्याकाळ झाली, तेव्हा लोकांनी आजारी असलेल्या आणि सर्व भूतग्रस्तांस आणले आणि येशूने त्यांना बरे केले.
1:35 i2xa सूर्य उगवण्यापूर्वी येशूने काय केले? सूर्य उगवण्यापूर्वी येशू एका एकांत ठिकाणी गेला आणि तेथे त्याने प्रार्थना केली.
1:38-39 y32l येशूने शिमोनला काय सांगितले की तो काय करायला आला आहे? येशूने सांगितले की तो आजूबाजूच्या शहरांमध्ये प्रचार करण्यासाठी आला आहे.
1:40-41 xyj3 येशूला बरे करण्याची विनवणी करणाऱ्या कुष्ठरोग्याबद्दल येशूचा दृष्टिकोन काय होता? येशूला कुष्ठरोग्यावर दया आली आणि त्याने त्याला बरे केले.
1:44 dzi8 येशूने कुष्ठरोग्याला काय करण्यास सांगितले आणि का? येशूने कुष्ठरोग्याला मोशेच्या आज्ञेप्रमाणे अर्पण करण्यास सांगितले. तो बरा झाल्याची साक्ष म्हणून समाजाची सेवा करेल.
2:4 zvpg पक्षघाती झालेल्या माणसाला घेऊन जाणाऱ्या चौघांनी काय केले?\r त्या माणसांनी घराचे छप्पर काढून पक्षघाती झालेल्या माणसाला येशूकडे खाली उतरवले.\n
2:5 efne पक्षघाती झालेल्या माणसाला येशू काय म्हणाला? येशू म्हणाला, "मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे".
2:6-7 k9lq येशूने जे सांगितले होते त्यावर काही शास्ऱ्यांनी आक्षेप का घेतला? काही शास्री यांनी युक्तिवाद केला की येशूने निंदा केली आहे कारण केवळ देवच पापांची क्षमा करू शकतो.
2:10-12 v3ys येशूने कसे दाखवले की त्याला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे? येशूने पक्षघाती झालेल्या माणसाला आपली बाज उचलून त्याच्या घरी जाण्यास सांगितले आणि त्या माणसाने तसे केले.
2:13-14 llaq जेव्हा येशूने लेवीला त्याचे अनुसरण करण्यास सांगितले तेव्हा लेवी काय करत होता? येशूने त्याला बोलावले तेव्हा लेवी जकात नाक्यावर बसला होता.
2:15-16 c07h लेवीच्या घरी येशू असे काय करत होता ज्यामुळे परुशी लोक नाराज झाले? येशू पापी लोक आणि कर गोळा करणाऱ्या लोकांबरोबर जेवत होता.
2:17 zqw0 येशू ने कोणाला सांगितले की तो बोलवण्यासाठी आला आहे? येशू म्हणाला की तो पापी लोकांना बोलावायला आला आहे.
2:18 p9ln उपवास करण्याबद्दल काही लोकांनी येशूला कोणता प्रश्न विचारला? त्यांनी येशूला विचारले की योहानाचे शिष्य आणि परुश्यांचे शिष्य उपवास करत असताना त्याच्या शिष्यांनी उपवास का केला नाही?
2:19 w6go येशूने त्याचे शिष्य उपवास का करत नाही हे कसे समजावून सांगितले? येशूने सांगितले की, वर अजूनही वऱ्हाड्यांबरोबर आहे तोपर्यंत ते उपवास करू शकत नाहीत.
2:23-24 ej7h शब्बाथ दिवशी येशूच्या शिष्यांनी काही शेतात असे काय केले ज्यामुळे परुशी लोक नाराज झाले? शब्बाथ दिवशी येशूच्या शिष्यांनी शेतातील कणसे मोडून खाल्ली.
2:25-26 iwe2 ज्यांना सामान्यत: भाकरीची गरज होती आणि त्यांनी खाऊ नये ती खाल्ली त्याबद्दल येशूने कोणते उदाहरण दिले? येशूने दावीदाचे उदाहरण दिले, ज्याने गरजेपोटी उपस्थितीची भाकरी खाल्ली, जी सामान्यत: याजकांसाठी राखीव होती.
2:27 m19r शब्बाथ कोणासाठी झालेला आहे असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे.
2:28 ak51 येशूने स्वतःसाठी कोणत्या अधिकाराचा दावा केला? येशूने म्हटले की तो शब्बाथाचाही प्रभू होता.
3:1-2 o82f शब्बाथाच्या दिवशी ते सभास्थानात येशूला का पाहत होते? शब्बाथाच्या दिवशी तो बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते येशूकडे पाहत होते, यासाठी की ते त्याच्यावर आरोप करू शकतील.
3:4 dk1g शब्बाथाबद्दल येशूने लोकांना कोणता प्रश्न विचारला? शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे ह्यांतून काय योग्य आहे, असे येशूने लोकांना विचारले.
3:4 p1z9 येशूच्या प्रश्नाला लोकांनी कसे उत्तर दिले? लोक गप्प राहिले.
3:5 mrbj मग येशूचा त्यांच्याविषयीचा दृष्टिकोन काय होता? येशू त्यांच्यावर रागावला.
3:6 acwq येशूने त्या माणसाला बरे केले तेव्हा परुश्यांनी काय केले? परूशी लोकांनी बाहेर जाऊन येशूला ठार मारण्याचा कट रचला.
3:7-8 b2bk येशू समुद्रातून जात असताना त्याच्या मागे किती लोक निघाले? येशूच्या मागोमाग मोठा जमाव निघाला.
3:11 tke0 येशूच्या मागोमाग मोठा जमाव निघाला. हा येशू देवाचा पुत्र आहे असे अशुद्ध आत्मे ओरडत होते.
3:14-15 e2s0 येशूने किती लोकांना प्रेषित म्हणून नेमले आणि त्यांनी काय करावे असे सांगितले? येशूने बारा प्रेषितांची नेमणूक केली, जे त्याच्याबरोबर राहतील, उपदेश करतील आणि त्यांना भुते काढण्याचा अधिकार असेल असे सांगितले.
3:19 raj7 येशूचा विश्वासघात करणारा प्रेषित कोण होता? येशूचा विश्वासघात करणारा प्रेषित यहूदा इस्कर्योत होता.
3:21 rh8o येशूच्या आजूबाजूच्या जमावाबद्दल आणि घटनांबद्दल येशूच्या कुटुंबाला काय वाटले? येशूच्या घरच्यांना वाटले की त्याला वेड लागले आहे.
3:22 xmhs शास्र्यांनी येशूवर कोणता आरोप केला? शास्र्यांनी येशूवर आरोप केला की त्याने भुतांच्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने भूतांना काढतो.
3:23-24 ob9v शास्र्यांच्या आरोपाला येशूने काय उत्तर दिले? येशूने उत्तर दिले की, आपसांत फुट पडलेले कोणतेही राज्य उभे राहू शकत नाही.
3:28-29 txqb येशूने कोणत्या पापाची क्षमा होऊ शकत नाही असे सांगितले? येशूने सांगितले की पवित्र आत्म्याविरुद्ध केलेली निंदा याची क्षमा केली जाऊ शकत नाही.
3:33-35 xtjn त्याची आई आणि भाऊ कोण आहेत असे येशूने म्हणाला? येशूने म्हणाला की जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच त्याचे आई आणि भाऊ आहेत.
4:1 bki3 येशू शिकवण्यासाठी मचव्यात का चढला? येशू एका मचव्यात चढून बसला आणि शिक्षण देऊ लागला कारण त्याच्या भोवती खूप मोठा समुदाय जमला होता.
4:4 wzuu वाटेवर पेरलेल्या बियाण्यांचे काय झाले? पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकले.
4:6 wyhf सूर्य उगवल्यावर खडकाळ जमिनीवर पेरलेल्या बियाण्यांचे काय झाले? मुळ नसल्यामुळे ते सुकले.
4:7 b6ma काटेरी झुडपांमध्ये पेरलेल्या बियाण्यांचे काय झाले? काटेरी झुडपांनी त्यांची वाढ खुंटवून टाकली .
4:8 ivy4 चांगल्या जमिनीत पेरलेल्या बियाण्यांचे काय झाले? पिक उगवले व तीस, साठ तर काहीं शंभर पट असे धान्य उत्पादन दिले.
4:11 o0ss येशूने असे काय सांगितले जे बारा जणांना दिले आहे, पण बाहेरच्यांना दिले नाही? येशूने सांगितले की देवाच्या राज्याचे रहस्य बारा जणांना दिले आहे, परंतु बाहेरच्यांना दिले नाही.
4:14 pskj येशूच्या‘ दाखल्यात, बीज म्हणजे काय? बीज हे देवाचे वचन आहे.
4:15 t1r5 वाटेवर पेरलेले बियाणे काय दर्शविते? हे त्यांना दर्शविते जे वचन ऐकतात, परंतु ताबडतोब सैतान ते काढून घेतो.
4:16-17 zy18 खडकाळ जमिनीवर पेरलेले बि काय दर्शविते? हे अशा लोकांचे दर्शविते जे आनंदाने वचन ऐकतात, परंतु जेव्हा छळ येतो, तेव्हा ते अडखळतात.
4:18-19 alo5 काटेरी झुडपांमध्ये पेरलेले बि काय दर्शविते? हे त्यांना दर्शविते जे वचन ऐकतात, परंतु जगाची काळजी वचनाची वाढ खुंटविते.
4:20 lhwr चांगल्या जमिनीत पेरलेले बियाणे काय दर्शविते? जे वचन ऐकतात, ग्रहण करतात आणि फळ देतात त्यांना दर्शविते.
4:22 c1ey लपलेल्या आणि गुप्त गोष्टींचे काय होईल असे येशूने म्हटले होते? येशूने म्हटले की लपवलेल्या आणि गुप्त गोष्टी प्रकाशात आणल्या जातील.
4:26-27 fteq देवाचे राज्य कशा प्रकारे आपले बी जमिनीत टाकणाऱ्या माणसासारखे आहे? माणूस बी टाकतो, आणि ते वाढते, पण हे कसे होते हे कळत नाही, मग पीक पिकल्यावर तो ते गोळा करतो.
4:30-32 tzc2 देवाचे राज्य कशा प्रकारे मोहरीच्या दाण्यासारखे आहे? मोहरीचा दाणा सर्वात लहान बि म्हणून असतो, तरीही त्याचे एक मोठे झाड बनते जिथे बरेच पक्षी त्यांचे घरटे बनवू शकतात.
4:35-37 tojt शिष्यांनी आणि येशूने सरोवर ओलांडले तेव्हा काय झाले? मोठे वादळ सुरू झाले, लाटांनी मचव्यात पाणी भरु लागले.
4:38 j9v3 येशू त्यावेळी मचव्यात काय करत होता? येशू झोपला होता.
4:38 vu2b शिष्यांनी येशूला कोणता प्रश्न विचारला? शिष्य येशूला म्हणाले की आपण मरणार आहोत याचे आपणाला काहीच वाटत नाही का?
4:39 vehj मग येशूने काय केले? येशूने वाऱ्याला धमकावले आणि समुद्र शांत केला.
4:41 fkpr येशूने असे केल्यावर, शिष्यांची प्रतिक्रिया काय होती? शिष्य अतिशय घाबरले आणि विचार करू लागले की येशू आहे तरी कोण, की वारा आणि समुद्र त्याची आज्ञा पाळतात.
5:1-2 f3h1 येशू गरसेकारांच्या देशात आला तेव्हा त्यांना कोण भेटले? अशुद्ध आत्मा लागलेला माणूस येशूला भेटला.
5:4 pvch लोकांनी या माणसाला साखळदंडाने बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय झाले होते? लोकांनी या माणसाला साखळदंडाने बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला असता त्याने साखळदंड तोडून टाकले होते.
5:7 s4bf अशुद्ध आत्म्याने येशूला कोणती उपाधी दिली? अशुद्ध आत्म्याने येशूला परात्पर देवाचा पुत्र असे संबोधले.
5:8 s0ay येशू त्या माणसातील अशुद्ध आत्म्याला काय म्हणत होता? येशू म्हणाला, "अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून बाहेर नीघ".
5:9 yw86 अशुद्ध आत्म्याचे नाव काय होते? अशुद्ध आत्म्याचे नाव सैन्य होते, कारण ते पुष्कळ होते.
5:13 jvth जेव्हा येशूने त्या माणसातून अशुद्ध आत्मा बाहेर काढला तेव्हा काय झाले? आत्मे बाहेर आले आणि डुकरांच्या कळपात शिरले, जो एका उंच टेकडीवरून पळत जाऊन तलावात बुडाला.
5:15 ist0 अशुद्ध आत्मा बाहेर काढल्यानंतर त्या माणसाची अवस्था काय होती? तो माणूस येशूबरोबर, वस्र घातलेला आणि शुद्धीवर आलेला असा बसला होता.
5:17 mpj9 या प्रदेशातील लोकांनी येशूला काय करण्यास सांगितले? लोकांनी येशूला त्यांचा प्रदेश सोडण्यास सांगितले.
5:19 w96x येशूने कबरेत राहणाऱ्या माणसाला आता काय करण्यास सांगितले? येशूने त्या माणसाला म्हटले की, प्रभूने त्याच्यासाठी जे काही केले ते त्याच्या लोकांना सांग.
5:22-23 pj22 सभास्थानाचा एक अधिकारी, याईर, याने येशूकडे कोणती विनंती केली? याईर ने येशूला विनवणी केली की त्याच्या मुलीवर हात ठेवण्यासाठी त्याच्याबरोबर यावे, जी मरावयास टेकली आहे.
5:25 atxm ज्या स्त्रीने येशूच्या वस्त्राला स्पर्श केला त्या स्त्रीला काय समस्या होती? ती स्त्री बारा वर्षांपासून रक्तस्त्रावाने पिडलेली होती.
5:28 afd1 त्या स्त्रीने येशूच्या’ वस्त्राला का स्पर्श केला? त्या स्त्रीला वाटले की जर तिने येशूच्या वस्त्राला स्पर्श केला तरी ती बरी होईन.
5:30 mrlf जेव्हा त्या स्त्रीने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला तेव्हा येशूने काय केले? येशूला माहित होते की त्याच्यातून शक्ती निघून गेली आहे म्हणून त्याने विचारले की त्याच्या वस्त्राला कोणी स्पर्श केला.
5:32 lyq8 त्या स्त्रीने त्याच्या वस्त्राला स्पर्श केल्यानंतर येशूने काय केले? त्याला कोणी स्पर्श केला आहे हे पाहण्यासाठी येशूने आजूबाजूला पाहिले.
5:34 jfch जेव्हा त्या स्त्रीने येशूला सर्व सत्य सांगितले, तेव्हा येशू तिला काय म्हणाला? येशूने तिला म्हटले की तिच्या विश्वासामुळे ती बरी झाली आहे आणि शांतीने जा.
5:35 spbi येशू जेव्हा घरात आला तेव्हा याईराच्या’ मुलीची अवस्था काय होती? याईराची मुलगी मरण पावली होती.
5:36 fai5 त्या वेळी येशू याईराला काय म्हणाला? येशू याईराला म्हणाला भिऊ नको, पण विश्वास मात्र धर.
5:37 ffse मूल ज्या खोलीत होते त्या खोलीत येशूबरोबर कोणते शिष्य गेले होते? पेत्र, याकोब आणि योहान येशूबरोबर खोलीत गेले.
5:40 sunl जेव्हा येशू म्हणाला की, याईराची मुलगी फक्त झोपली आहे तेव्हा घरातील लोकांनी काय केले? जेव्हा येशू म्हणाला की, याईराची मुलगी फक्त झोपली आहे तेव्हा लोक त्याच्यावर हसले.
5:42 km08 मुल उठून चालू लागले, तेव्हा लोकांची प्रतिक्रिया कशी होती? लोक अत्यंत भारावून गेले आणि आश्चर्यचकित झाले.
6:2 o2l2 येशूच्या मूळ गावातील लोक त्याच्याबद्दल का थक्क झाले? त्याची शिकवण, त्याचे ज्ञान आणि त्याची महत्कृत्ये हे त्याला कोठून मिळाले हे लोकांना माहित नव्हते.
6:4 d9fa येशूने कोठे म्हटले की संदेष्टा सन्मान पावत नाही? येशूने म्हटले की, संदेष्टा त्याच्या मूळ गावी, त्याच्या नातेवाईकांमध्ये आणि स्वतःच्या सन्मान पावत नाही.
6:6 arwk येशूला त्याच्या मूळ गावातील लोकांबद्दल कशाचे आश्चर्य वाटले? येशूला त्याच्या मूळ गावातील लोकांचा अविश्वास पाहून आश्चर्य वाटले.
6:7 djdl येशूने बारा जणांना बाहेर पाठवताना त्यांना कोणता अधिकार दिला? येशूने बारा जणांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला.
6:8-9 e4e2 बारा जण त्यांच्या प्रवासात त्यांच्याबरोबर काय घेऊन गेले? बारा जणांनी एक जोडी वहाणा आणि एक काठी घेतली.
6:11 yfhp जर एखाद्या ठिकाणी त्यांचे स्वागत झाले नाही तर येशूने बारा जणांना काय करण्यास सांगितले? येशूने बारा जणांना त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून त्यांच्या पायाखालची धूळ झाडून टाकण्यास सांगितले.
6:14-15 iota येशू कोण आहे असे लोकांना वाटले? येशू बाप्तिस्मा करणारा योहान किंवा एलीया किंवा संदेष्टा आहे असे लोक मानत असत.
6:18 wv8i बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने हेरोदाला काय सांगितले होते की तो बेकायदेशीरपणे काय करत आहे? हेरोदाने आपल्या भावाच्या बायकोशी लग्न करणे बेकायदेशीर असल्याचे योहानाने हेरोदाला सांगितले होते.
6:20 l858 योहानाचे बोलणे ऐकून हेरोदाची प्रतिक्रिया कशी होती? योहानाचे बोलणे ऐकून हेरोद गोंधळून जाई, पण तरीही तो त्याचे आनंदाने ऐकून घेई.
6:23 fzf0 हेरोदाने हेरोदियाला कोणती शपथ दिली? हेरोदेने शपथ घेतली की तिने त्याच्याकडून जे काही मागितले ते त्याच्या अर्ध्या राज्यापर्यंत ती मिळवू शकते.
6:25 tn2q हेरोदियाने काय मागितले? हेरोदियाने एका तबकात बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर मागितले.
6:26 cu47 हेरोदियाच्या विनंतीला हेरोदाने कशी प्रतिक्रिया दिली? हेरोद फारच खिन्न झाला पण त्याने त्याच्या पाहुण्यांसमोर घेतलेल्या शपथांमुळे तिची विनंती नाकारली नाही.
6:33 c20j जेव्हा येशू आणि प्रेषितांनी विश्रांती घेण्यासाठी स्वतःहून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय झाले? बऱ्याच लोकांनी त्यांना ओळखले आणि येशू आणि प्रेषितांच्या अगोदर तेथे पोहोचण्यासाठी धावत गेले.
6:34 mdl0 त्यांची वाट पाहत असलेल्या समुदायाकडे पाहण्याचा येशूचा दृष्टिकोन कसा होता? येशूला त्यांचा कळवळा आला कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.
6:37 if60 जेव्हा येशूने विचारले, तेव्हा लोकांना खावयास देण्यासाठी त्यांना काय करावे लागेल असे शिष्यांना वाटले? शिष्यांना वाटले की त्यांना जाऊन दोनशे रुपयाच्या भाकरी विकत घ्याव्यात.
6:38 o56u शिष्यांकडे त्यांच्याबरोबर आधीपासूनच कोणते अन्न होते? शिष्यांकडे आधीपासूनच पाच भाकरी आणि दोन मासे होते.
6:41 bqyw भाकरी आणि मासे घेऊन येशूने काय केले? भाकरी आणि मासे घेऊन येशूने स्वर्गाकडे पाहिले, आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या, आणि त्याच्या शिष्यांना दिल्या.
6:43 zbvh सगळ्यांनी खाल्ल्यानंतर किती अन्न शिल्लक राहिले? सर्वांनी खाल्ल्यानंतर भाकरीच्या बारा टोपल्या आणि माशांचे तुकडे शिल्लक होते.
6:44 yrio किती पुरुष खाणारे होते? तेथे पाच हजार पुरुष खाणारे होते.
6:48 uxae येशू सरोवरावरील शिष्यांकडे कसा आला? येशू सरोवरावरा वरून चालत शिष्यांकडे आला.
6:50 j2xz जेव्हा शिष्यांनी येशूला पहिले तेव्हा येशू काय म्हटले? येशू शिष्यांना म्हणाला धीर धरा आणि घाबरू नका.
6:52 icdc शिष्यांना भाकरीचा चमत्कार का उमगला नाही? शिष्यांना भाकरीचा चमत्कार उमगला नाही कारण त्यांचे मन समजण्यास हळू होते.
6:55 qidu त्या प्रदेशातील लोकांनी येशूला ओळखले तेव्हा त्यांनी काय केले? लोक दुखाणेकऱ्यांना घेऊन येशूकडे गेले जिथे त्यांनी येशू येणार असल्याचे ऐकले.
6:56 nkto ज्यांनी येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला त्यांचे काय झाले? ज्यांनी येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला नुकताच स्पर्श केला ते बरे झाले.
7:2 t05x येशूचे काही शिष्य असे काय करत होते ज्यामुळे परुशी व शारत्री नाराज झाले? काही शिष्य न धुतलेल्या हातांनी जेवत होते.
7:3-4 ym0v जेवण्यापूर्वी हात, प्याले, घागरी आणि पितळेची भांडी धुण्याचा कोणाचा संप्रदाय होता? जेवण्यापूर्वी हात, प्याले, घागरी आणि पितळेची भांडी धुवावीत, असा वाडवडीलांचा संप्रदाय होता.
7:8-9 qrmr येशूने परुशी व शारत्री यांना धुण्याच्या विषयावरील त्यांच्या शिकवणुकीबद्दल काय सांगितले? येशूने सांगितले की परुशी व शारत्री हे देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांचे नियम शिकवता.
7:11-13 d1yr आपल्या बापाचा व आईचा मान राख असे सांगणारी देवाची आज्ञा परुशी व शारत्री यांनी कशी नाकारली? त्यांनी लोकांना सांगितले की त्यांच्या वडिलांना आणि आईला मदत करणारे पैसे कुर्बान म्हणज अर्पण केले पाहिजे असे म्हणून त्यांनी देवाची आज्ञा रद्द केली आहे.
7:15 nqfn एखाद्या व्यक्तीला काय भ्रष्ट करत नाही, असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही असू शकत नाही.
7:15 l384 एखाद्या व्यक्तीला काय भ्रष्ट करते, असे येशूने म्हटले? येशू म्हणाला की, एखाद्या व्यक्तीच्या आतून जे काही बाहेर येते ते त्याला भ्रष्ट करते.
7:18-19 gvrq एखाद्या व्यक्तीला काय भ्रष्ट करत नाही, असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही असू शकत नाही.
7:19 yf7h येशूने कोणत्या प्रकारचे अन्न शुद्ध असल्याचे ठरवले? येशूने सर्व अन्नपदार्थ शुद्ध असल्याचे ठरवले.
7:20-23 w1ic एखाद्या व्यक्तीला काय भ्रष्ट करते, असे येशूने म्हटले? येशू म्हणाला की, एखाद्या व्यक्तीच्या आतून जे काही बाहेर येते ते त्याला भ्रष्ट करते.
7:21-22 t1rz येशूने सांगितलेल्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या एखाद्या व्यक्तीला भ्रष्ट करण्यासाठी बाहेर येऊ शकतात? येशूने सांगितले की वाईट विचार, जराकार्मे, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार आणि मूर्खपणा ह्या एखाद्या व्यक्तीच्या आतून भ्रष्ट करण्यासाठी बाहेर येऊ शकतात.
7:25-26 y2wf ज्याच्या मुलीला अशुद्ध आत्मा होता ती स्त्री यहुदी होती की ग्रीक? ज्या स्त्रीच्या मुलीला अशुद्ध आत्मा होता ती ग्रीक होती.
7:28 q2o4 जेव्हा येशू तिला म्हणाला की मुलांची भाकरी घेऊन कुत्र्यांना टाकणे योग्य नाही तेव्हा त्या स्त्रीने काय उत्तर दिले? त्या स्त्री म्हणाली की, मेजाखालील कुत्रेही मुलांचा चुरा खातात.
7:29-30 nb1x येशूने त्या स्त्रीसाठी काय केले? येशूने त्या अशुद्ध आत्म्याला त्या स्त्रीच्या मुलीतून बाहेर काढले.
7:33-34 ca4d बहिरा आणि तोतऱ्या माणसाला जेव्हा येशूकडे आणले, तेव्हा त्याने त्याला बरे करण्यासाठी काय केले? येशूने त्या माणसाच्या कानात बोटे घातली, थुंकले आणि त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि मग स्वर्गाकडे पाहिले आणि म्हणाला, "मोकळा हो!"
7:36 hc18 जेव्हा येशूने त्यांना त्याला दिलेल्या आरोग्याबद्दल कोणालाही सांगू नये असे सांगितले तेव्हा लोकांनी काय केले? येशूने त्यांना शांत राहण्याची जेवढी आज्ञा दिली, तेवढे ते अधिकच जाहीर करत गेले.
8:1-2 slgu येशूने त्याच्या मागोमाग आलेल्या मोठ्या जमावाबद्दल कोणती चिंता व्यक्त केली? मोठ्या समुदायाकडे खायला काहीच नसल्यामुळे येशूला त्यांचा कळवळा आला.
8:5 s9oj शिष्यांकडे किती भाकरी होत्या? शिष्यांकडे सात भाकरी होत्या.
8:6 y5p3 येशूने शिष्यांकडे असलेल्या भाकरीचे काय केले? येशूने आभार मानले, भाकरी मोडल्या आणि त्याच्या शिष्यांना वाढण्यासाठी दिल्या.
8:8 ckyo सर्वांनी खाल्ल्यानंतर किती अन्न शिल्लक राहिले? सर्वांनी खाल्ल्यानंतर अन्नाच्या सात पाट्या शिल्लक राहिल्या.
8:9 h9sm किती लोकांनी अन्न खाल्ले आणि समाधानी झाले? सुमारे चार हजार माणसे जेवून तृप्त झाली.
8:11 bo9w त्याची परीक्षा घेण्यासाठी येशूने काय करावे, अशी परुश्यांची इच्छा होती? येशूने त्यांना स्वर्गातून एक चिन्ह द्यावे अशी परुश्यांची इच्छा होती.
8:15 jt3x येशूने त्याच्या शिष्यांना परुशी लोकांविषयी कशाबद्दल सावध केले होते? येशूने त्याच्या शिष्यांना परुशी लोकांचे खमीर यापासून सावध राहण्याचा इशारा दिला.
8:16 fjm2 येशू कशाबद्दल बोलत आहे असे शिष्यांना वाटले? शिष्यांना वाटले की ते भाकरी आणण्यास विसरले आहेत या गोष्टीबद्दल येशू बोलत आहे.
8:19 nrwx येशूने त्याच्या शिष्यांना आठवण करून दिली की जेव्हा येशूने पाच भाकरी मोडल्या होत्या तेव्हा काय झाले होते? येशूने त्यांना आठवण करून दिली की जेव्हा त्याने पाच भाकरी मोडल्या तेव्हा पाच हजार लोकांना खायला दिले गेले होते आणि तुटलेल्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या घेण्यात आल्या होत्या.
8:23 lkdf आंधळ्या माणसाची दृष्टी पूर्ववत करण्यासाठी येशूने प्रथम त्याच्याबरोबर कोणत्या दोन गोष्टी केल्या? येशूने प्रथम त्याच्या डोळ्यांत थुंकले आणि त्याच्यावर हात ठेवले.
8:25 w8lo येशूने आंधळ्या माणसाची दृष्टी पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठी त्याच्याबरोबर कोणती तिसरी गोष्ट केली? येशूने पुन्हा त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला.
8:28 scql येशू आहे असे म्हणणारे लोक कोण होते? लोक म्हणत होते की येशू बाप्तिस्मा करणारा योहान, एलीया किंवा संदेष्ट्यांपैकी एक.
8:29 pf6h पेत्राने येशू कोण आहे असे म्हटले? पेत्र म्हणाला की येशू ख्रिस्त आहे.
8:31 ssr3 भविष्यातील कोणत्या घटनांबद्दल येशूने आपल्या शिष्यांना स्पष्टपणे शिकवण्यास सुरवात केली? येशूने त्याच्या शिष्यांना शिकवले की मनुष्याच्या पुत्राने दु:ख भोगावे, नाकारले जावे, मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी त्याला उठवले जावे.
8:33 o8md पेत्राने त्याला दटावण्यास सुरुवात केली तेव्हा येशू काय म्हणाला? येशू पेत्राला म्हणाला, "सैताना, माझ्यापुढून चालता हो. तुला देवाच्या गोष्टींची काळजी नाही, तर लोकांच्या गोष्टींची काळजी आहे.'
8:34 vqyx ज्याला त्याचा शिष्य व्हायचे आहे त्याने काय करावे असे येशू म्हणाला? येशू म्हणाला की जो कोणी त्याचा शिष्य होऊ इच्छितो त्याने स्वत: ला नाकारावे, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि येशूचे अनुसरण करावे.
8:36 eosc एखाद्या व्यक्तीच्या जगातल्या गोष्टी मिळवण्याच्या इच्छेबद्दल येशू काय म्हणाला? येशू म्हणाला, " मनुष्याने संपूर्ण जग मिळवले आणि नंतर आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर काय लाभ?"
8:38 fczm ज्यांना त्याची आणि त्याच्या वचनांची लाज वाटते त्यांच्याविषयी तो काय करेल असे येशूने म्हटले होते? येशू म्हणाला की त्याच्या येण्याच्या वेळी त्याला त्या लोकांची लाज वाटेल ज्यांना त्याची आणि त्याच्या वचनांची लाज वाटते.
9:1 ryud देवाचे राज्य सामर्थ्यासह येताना कोण पाहील असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की त्याच्याबरोबर तेथे उभे असलेले काही लोक देवाचे राज्य सामर्थ्यासह येताना पाहण्यापूर्वी मरणार नाहीत.
9:2-3 j5nw पेत्र, याकोब आणि योहान येशूबरोबर उंच पर्वतावर गेले तेव्हा येशूचे काय झाले? येशूचे रूपांतर झाले आणि त्याची वस्त्रे तेजस्वी झाली.
9:4 hssp डोंगरावर येशूबरोबर कोण बोलत होते? एलीया आणि मोशे येशूबरोबर बोलत होते.
9:7 gnw6 डोंगरावर, मेघातून काय वाणी झाली? ती वाणी म्हणाली, "हा माझा प्रिय पुत्र आहे. त्याचे ऐका".
9:9 wh06 येशूने शिष्यांना डोंगरावर जे पाहिले त्याबद्दल काय आज्ञा दिली? येशूने त्यांना आज्ञा केली की, जोपर्यंत मनुष्याचा पुत्र मृतातून उठत नाही, तोपर्यंत त्यांनी जे पाहिले ते कोणालाही कळवू नका.
9:11-13 ct8y एलीयाच्या येण्याबद्दल येशू काय म्हणाला? येशूने म्हटले की एलिया सर्व गोष्टी यथास्थित करण्यासाठी प्रथम येतो आणि एलिया आधीच आला होता.
9:17-18 tzbr शिष्य पिता आणि मुलासाठी काय करू शकले नाहीत? शिष्यांना पित्याच्या मुलातून दुष्ट आत्म्याला काढता आले नाही.
9:22 ifim दुष्ट आत्म्याने मुलाचा नाश करण्याचा प्रयत्न करण्यासाठी काय केले? दुष्ट आत्म्याने मुलाचा नाश करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याला विस्तवात किंवा पाण्यात टाकले.
9:23-24 ay7z जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे असे येशूने म्हटल्यावर बापाने काय म्हटले? पित्याने म्हणाले, "माझा विश्वास आहे! माझ्या अविश्वास घालवून टाका!"
9:28-29 uh6o मुलामधील मूक-बधिर आत्म्याला बाहेर काढणे शिष्यांना का जमले नाही? शिष्य मूक-बधिर आत्म्याला बाहेर काढू शकले नाहीत, कारण प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही ही जात निघत नाही.
9:31 uvpd येशूने त्याचे काय होणार आहे असे त्याच्या शिष्यांना सांगितले होते? येशूने त्यांना सांगितले की त्याला जीवे मारले जाईल, त्यानंतर तो तीन दिवसांनी पुन्हा उठेल.
9:33-34 q8mj वाटेत शिष्य कशाविषयी वाद घालत होते? त्यांच्यापैकी सर्वात मोठा कोण ह्याविषयी शिष्य वाद घालत होते.
9:35 xnwc येशूने प्रथम कोण मोठा आहे असे म्हटले? येशू म्हणाला की जो पहिल्याने सर्वांचा सेवक होतो तो मोठा आहे.
9:36-37 d095 जो कोणी येशूच्या नावाने एक लहान मूलाला स्वीकारतो, तेव्हा तो कोणाला देखील स्वीकारतो? जो कोणी येशूच्या नावाने एक लहान मूलाला स्वीकारतो, तेव्हा तो येशू आणि येशूला पाठविणाऱ्याला देखील स्वीकारतो.
9:42 xm92 जो येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लहान मुलास अडखळण्यास कारणीभूत ठरेल त्याच्यासाठी काय हिताचे असेल? त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकले जावे हे त्याच्यासाठी हिताचे आहे.
9:47 qvrv जर तुझा डोळा पापास प्रवृत्त करत असेल तर येशूने डोळ्याचे काय करावयास सांगितले? येशू म्हणाला की जर तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक.
9:48 l2p2 नरकात काय घडते असे येशूने म्हटले? येशू म्हणाला की नरकात किडा मरत नाही, व अग्नी विझत नाही.
10:2 tk8r येशूची परीक्षा घेण्यासाठी परुश्यांनी येशूला कोणता प्रश्न विचारला? परुश्यांनी येशूला विचारले की पुरुषाने आपल्या पत्नीला सुटपत्र देणे कायदेशीर आहे का?
10:4 p0nl मोशेने यहुद्यांना सुटपत्रासंबंधी कोणती आज्ञा दिली होती? मोशेने एका पुरुषाला सुटपत्राचे प्रमाणपत्र लिहावे आणि नंतर आपल्या पत्नीला टाकण्याची परवानगी दिली होती.
10:5 cuwg मोशेने यहुद्यांना सुटपत्रासंबंधी ही आज्ञा का दिली होती? मोशेने यहुद्यांना ही आज्ञा त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे दिली होती.
10:6 b18w येशूने प्रारंभापासून कोणत्या घटनेचा उल्लेख परुश्यांना देवाने विवाहाच्या मूळ आराखड्याबद्दल सांगताना केला होता? येशूने विवाहासंबंधी देवाने मूळ निर्मितीबद्दल सांगताना प्रारंभापासून स्त्री आणि पुरुष यांच्या निर्मितीचा उल्लेख केला.
10:7-8 lkz2 जेव्हा पुरुष आणि त्याची पत्नी या दोघांचे लग्न होते, तेव्हा ते काय बनतात असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की, ती दोघे एक देह होतील.
10:9 bxgt देव वैवाहिक जीवनात कोणत्या गोष्टी एकत्र जोडतो याविषयी येशूने काय म्हटले? येशू म्हटले की, देव ज्याला एकत्र जोडतो, त्याला कोणीही विभक्त करू नये.
10:13-14 ftqq लहान मुलांना त्याच्याकडे आणणाऱ्यांना शिष्यांनी दटावले तेव्हा येशूची प्रतिक्रिया काय होती? येशू शिष्यांवर रागावला आणि त्याने त्यांना लहान मुलांना त्याच्याकडे येऊ देण्यास सांगितले.
10:15 s8f7 येशूने कसे सांगितले की देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी काय प्राप्त केले पाहिजे? येशूने सांगितले की देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी लहान मुलाप्रमाणे झाले पाहिजे.
10:19 slbl सार्वकालिक जीवन हे वतन मिळविण्यासाठी येशूने प्रथम त्या मनुष्याने काय केले पाहिजे हे सांगितले? येशूने त्या मनुष्याला सांगितले की, त्याने खून करू नये, व्यभिचार करू नये, चोरी करू नये, खोटी साक्ष देऊ नये, फसवू नये आणि आपला बाप व आईचा आदर करावा.
10:21 h1nt मग येशूने त्या मनुष्याला आणखी कोणती आज्ञा दिली? मग येशूने त्या मनुष्याला आज्ञा दिली की, त्याच्याकडे जे काही आहे ते विकून त्याच्या मागे जावे.
10:22 r5hj जेव्हा येशूने त्याला ही आज्ञा दिली तेव्हा त्या मनुष्याची प्रतिक्रिया कशी होती, आणि का? तो मनुष्य कष्टी होऊन निघून गेला, कारण त्याच्याकडे पुष्कळ संपत्ती होती.
10:23-25 fn0b देवाच्या राज्यात प्रवेश करण्यात कोणाला खूप कठीण आहे असे येशूने म्हटले होते? येशूने सांगितले की श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे खूप कठीण आहे.
10:26-27 a2pr एका श्रीमंत व्यक्तीचेही तारण होणे शक्य आहे हे येशूने कसे सांगितले? येशू म्हणाला की मनुष्याला हे अशक्य आहे, परंतु देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत.
10:29-30 ut0n येशूसाठी ज्याने घरदार, कुटुंब आणि शेतीवाडी सोडली त्याला काय प्राप्त होईल असे येशूने म्हटले? येशू म्हटले की, त्यांना या जगात छळवणुकीबरोबर शंभरपटीने, आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.
10:32 t4vq येशू आणि शिष्य कोणत्या वाटेवरून प्रवास करत होते? येशू आणि शिष्य यरुशलेमकडे जाणाऱ्या वाटेवरून प्रवास करत होते.
10:33-34 ie59 येशूने त्याच्या शिष्यांना यरुशलेममध्ये काय होईल असे सांगितले होते? येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की त्याला देहांत शिक्षा ठरवतील आणि त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन केले जाईल.
10:35-37 mu7d याकोब आणि योहान यांनी येशूकडे कोणती विनंती केली? याकोब आणि योहान यांनी येशूच्या उजव्या आणि डाव्या हाताला गौरवाने बसू द्यावे अशी विनंती केली.
10:39 xafk याकोब आणि योहान यांना सहन करवेल का असे येशूने काय म्हटले होते? येशूने म्हटले की जो प्याला येशू पिणार आहे, आणि ज्या बाप्तिस्म्याने येशू बाप्तिस्मा घेईल तो याकोब आणि योहान यांना सहन करवेल का.
10:40 vd45 येशूने याकोब आणि योहानाची विनंती मान्य केली का? नाही, येशू म्हणाला की त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे कोणाला बसू द्यायचे हे त्याच्या हाती नाही.
10:42 m3q4 परराष्ट्रीयांचे सत्ताधारी त्यांच्या प्रजेशी कसे वागतात, असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की, परराष्ट्रीयांचे सत्ताधारी त्यांच्या प्रजेवर प्रभुत्व गाजवतात.
10:43-44 yky8 ज्यांना शिष्यांमध्ये महान व्हायचे आहे त्यांनी कसे झाले पाहिजे असे येशूने म्हटले? येशू म्हणाला की ज्यांना शिष्यांमध्ये महान व्हायचे आहे त्यांनी सर्वांचे सेवक असले पाहिजे.
10:48 ece0 बार्तीमय या आंधळ्या मनुष्याने काय केले, जेव्हा अनेकांनी त्याला शांत राहण्यास सांगितले? बार्तीमय अधिकच ओरडू लागला, "दावीद पुत्र, माझ्यावर दया कर!"
10:52 rato येशूने बार्तीमयला त्याच्या अंधत्वातून बरे करण्यासाठी काय म्हटले होते? येशूने म्हटले की, बार्तीमयच्या विश्वासाने त्याला बरे केले आहे.
11:2 agr2 येशूने त्याच्या दोन शिष्यांना त्यांच्या समोरच्या गावात काय करायला पाठवले? येशूने त्यांना त्याच्याकडे एक शिंगरू आणण्यासाठी पाठवले ज्याच्यावर कोणी कधीही बसले नव्हते.
11:5-6 u8he शिष्यांनी शिंगरू सोडले तेव्हा काय झाले? काही लोकांनी शिष्यांना विचारले की ते काय करीत आहेत, तेव्हा येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी लोकांना सांगितले, आणि लोकांनी त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दिले.
11:8 cgd8 येशू शिंगरावर स्वार झाला तेव्हा लोकांनी रस्त्यावर काय पसरले? रस्त्यावर लोकांनी शेतमळयातून तोडून आणलेल्या डहाळ्या आणि त्यांचे कपडे पसरले.
11:10 vfq1 येशू यरुशलेमच्या दिशेने जात असताना लोक कोणत्या राज्याबद्दल ओरडत होते? लोक ओरडत होते की त्यांचा बाप वडील दावीद याचे राज्य येत आहे.
11:11 pj8s मंदिरात प्रवेश करताना येशूने काय केले? येशूने सभोवार पाहिले आणि मग बेथानीस निघून गेला.
11:14 qg7e अंजीराच्या झाडाला फळे नसलेले पाहून येशूने काय केले? येशू अंजीराच्या झाडाला म्हणाला, "ह्यापुध्ये कोणीही तुझे फळ कधीही न खावो".
11:15-16 pbr1 येशूने ह्यावेळी मंदिराच्या परिसरात प्रवेश केला तेव्हा त्याने काय केले? येशू विक्रेत्यांना आणि खरेदीदारांना बाहेर घालवून देऊ लागला आणि कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरातून नेआण करू दिली नाही.
11:17 dgql पवित्र शास्त्रानुसार मंदिर काय असावे असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर म्हणतील असे म्हटले आहे.
11:17 hpgp मुख्य याजक आणि शास्त्र्यांनी मंदिराचे काय केले आहे असे येशूने म्हटले? येशू म्हणाला की त्यांनी मंदिराला लुटारूंची गुहा करून टाकले आहे.
11:18 x7nj मुख्य याजक आणि शास्त्री येशूला काय करण्याचा प्रयत्न करीत होते? मुख्य याजक आणि शास्त्री येशूला जीवे मारण्याचा प्रयत्न करत होते.
11:20 geb7 येशू ज्या अंजीराच्या झाडाला बोलला होता त्याचे काय झाले? येशू ज्या अंजीराच्या झाडाला बोलला होता, ते झाड मुळापासून वाळून गेले होते.
11:24 okwn प्रार्थनेत आपण जे काही मागतो त्याबद्दल येशूने काय सांगितले? येशूने सांगितले की, आपण प्रार्थनेत जे काही मागतो, ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा म्हणजे ते आपल्याला मिळेल.
11:25 udpr स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला क्षमा करावी म्हणून आपण काय केले पाहिजे असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की, आपल्या मनात कोनाविरुद्ध जे काही असेल तर त्याची क्षमा केली पाहिजे यासाठी की पित्याने देखील आपल्याला क्षमा करावी.
11:27-28 y3u8 मंदिरातील मुख्य याजक, शास्त्री आणि वडील येशूकडून काय जाणून घेऊ इच्छित होते? त्यांना हे जाणून घ्यायचे होते तो करत असलेल्या गोष्टी त्याने कोणत्या अधिकाराने केल्या.
11:29-30 cdce येशूने मुख्य याजकांना, शास्त्र्यांना आणि वडिलांना कोणता प्रश्न विचारला? येशूने त्यांना विचारले की योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून आहे की मनुष्यापासून.
11:31 qfb1 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून आहे, याचे उत्तर मुख्य याजक, शास्त्री आणि वडील यांना का द्यायचे नव्हते? त्यांना हे उत्तर द्यायचे नव्हते कारण येशूने विचारले असते की त्यांनी योहानावर विश्वास का ठेवला नाही.
11:32 zg5i योहानाचा बाप्तिस्मा मनुष्यापासून होता, याचे उत्तर मुख्य याजकांना, शास्त्र्यांना आणि वडिलांना का द्यायचे नव्हते? त्यांना हे उत्तर द्यायचे नव्हते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती, त्यांचा विश्वास होता की योहान हा एक संदेष्टा होता.
12:1 k9g4 द्राक्षमळा बांधून खंडाने दिल्यानंतर मालकाने काय केले? द्राक्षबाग बांधून खंडाने दिल्यानंतर मालक प्रवासाला निघून गेला.
12:5 qm75 द्राक्षमळ्याच्या फळातून काही घेण्यासाठी मालकाने पाठवलेल्या अनेक नोकरांचे माळ्यांनी काय केले? द्राक्ष माळ्यांनी काहींना मारहाण केली तर काही नोकरांना जीवे मारले.
12:6 p7p2 मालकाने माळ्यांकडे शेवटी कोणाला पाठवले? मालकाने शेवटी आपल्या आवडत्या मुलाला पाठवले.
12:8 abgx मालकाने शेवटी पाठवलेल्याचे माळ्यांनी काय केले? द्राक्षमळ्याच्या माळ्यांनी त्याला पकडून जीवे मारले आणि द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले.
12:9 bpsj द्राक्षमळ्याचा मालक द्राक्ष द्राक्षमळ्याच्या माळ्यांचे काय करेल? द्राक्षमळ्याचा मालक येऊन द्राक्षमळा नष्ट करेल आणि द्राक्षमळा इतरांना देईल.
12:10 c54c शास्त्रात बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केलेल्या दगडाचे काय झाले? बांधकाम बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केलेल्या दगड तोच कोनशीला झाला.
12:14 n5ve परुशी आणि काही हेरोदी लोकांनी येशूला कोणता प्रश्न विचारला? त्यांनी त्याला विचारले की कैसरला कर देणे कायदेशीर आहे की नाही.
12:17 z3xo येशूने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर कसे दिले? येशू त्यांना म्हणाला, कैसरच्या ज्या गोष्टी आहेत त्या कैसरला द्या आणि ज्या गोष्टी देवाच्या आहेत त्या देवाला द्या.
12:18 jy15 कशावर सदूकी लोकांचा विश्वास नव्हता? सदूकी लोकांचा पुनरुत्थानावर विश्वास नव्हता.
12:22 nmuk सदूकींनी सांगितलेल्या गोष्टीत त्या स्त्रीला किती पती होते? त्या स्त्रीला सात पती होते.
12:23 fehv सदूकी लोकांनी येशूला त्या स्त्रीबद्दल कोणता प्रश्न विचारला? पुनरुत्थानसमयी त्या स्त्रीचा पती कोण असेल, अशी विचारणा त्यांनी केली.
12:24 bs3e येशूने सदूकी लोकांना त्यांच्या चुकीसाठी कोणते कारण दिले? येशू म्हणाला की, सदूकी लोकांना शास्त्र माहीत नाही व देवाचे सामर्थ्यही माहीत नाही.
12:25 ks2q त्या स्त्री विषयी सदूकी लोकांनी विचारलेल्या प्रश्नावर येशूने काय उत्तर दिले? येशू म्हणाला की पुनरुत्थानसमयी, पुरुष आणि स्त्रिया लग्न करत नाहीत, तर ते देवदूतांसारखे असतात.
12:26-27 ete1 पुनरुत्थान आहे हे येशूने शास्त्रवचनांमधून कसे दाखवले? येशूने मोशेच्या पुस्तकातून स्पष्ट केले, जिथे देव म्हणतो की तो अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे - जे तेव्हा जिवंत असावेत.
12:29-30 tzeh येशूने कोणती आज्ञा सर्वात महत्वाची असल्याचे सांगितले? येशूने म्हटले की, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर ही सर्वात महत्वाची आज्ञा आहे.
12:31 mh0y येशूने कोणती आज्ञा दुसरी आहे असे म्हटले? येशूने म्हटले की, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे ही दुसरी आज्ञा आहे.
12:35-37 qo6t दावीदाविषयी येशूने शास्त्र्यांना कोणता प्रश्न विचारला? येशूने विचारले की, ख्रिस्त दावीदाचा पुत्र असताना दावीद ख्रिस्ताला प्रभु कसे म्हणू शकतो.
12:38-40 ndcc शास्त्र्यांपासून सावध राहा, असे येशूने लोकांना का म्हणाला? येशूने म्हटले की, शास्त्र्यांना मनुष्याकडून सन्मान मिळवण्याची इच्छा आहे, परंतु ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि लोकांनी पाहावे म्हणून लांबलांब प्रार्थना करतात.
12:44 vxj4 येशूने असे का म्हटले की, गरीब विधवेने भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा जास्त रक्कम टाकली आहे? येशूने म्हटले की तिने तिच्या दारिद्र्यातून अधिक टाकले आहे तर इतरांनी त्यांच्या विपुलतेतून टाकले आहे.
13:2 a889 मंदिरातील अद्भुत दगड आणि वास्तूंचे काय होईल असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की, एक दगड दुसऱ्यावर शिल्लक राहणार नाही.
13:4 et3p तेव्हा शिष्यांनी येशूला कोणता प्रश्न विचारला? शिष्यांनी येशूला विचारले की या गोष्टी केव्हा घडतील आणि त्याचे काय चिन्ह होईल.
13:5-6 znvi शिष्यांनी कशाविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे असे येशू म्हणू लागला? येशू म्हणू लागला की कोणीही त्यांना फसवू नये म्हणून शिष्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
13:7-8 umt6 वेदनांचा प्रारंभ होईल याविषयी येशूने काय म्हटले? येशू म्हणाला की वेदनांचा प्रारंभ लढाया, लढायांच्या अफवा, भूकंप आणि दुष्काळ असेल.
13:9 arqh येशूने शिष्यांच्या बाबतीत काय होईल असे सांगितले? येशूने सांगितले की शिष्यांना न्यायसाभांच्या स्वाधीन जाईल, सभास्थानांमध्ये मार देतील आणि साक्षी म्हणून सुभेदार व राजे ह्यांच्यापुढे उभे रहावे लागेल.
13:10 p9a0 प्रथम काय झाले पाहिजे असे येशू म्हणाला? येशूने म्हटले की, सर्व राष्ट्रांना प्रथम सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.
13:12 zlct कुटुंबातील सदस्यांमध्ये काय होईल असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की, कुटुंबातील एक सदस्य कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला ठार मारवण्याकरता धरून देईल.
13:13 trz5 कोण तारला जाईल असे येशू म्हणाला? येशू म्हणाला की जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल.
13:14 a194 ओसाडीचा अमंगळ पदार्थ पाहाल तेव्हा जे यहूदीयात आहेत त्यांनी काय करावे असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की जे यहूदीयात आहेत त्यांनी ओसाडीचा अमंगळ पदार्थ पाहून डोंगराकडे पळून जावे.
13:20 pgpi प्रभू निवडलेल्या लोकांसाठी काय करेल, यासाठी की त्यांचे तारण होईल, याविषयी येशूने काय म्हटले? येशूने म्हटले की, प्रभूने निवडलेल्या लोकांसाठी हालअपेष्टांचे दिवस कमी करेल.
13:22 zmok लोकांना फसवण्यासाठी कोण उद्भवतील असे येशूने म्हटले? येशूने म्हटले की खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे लोकांना फसवण्यासाठी उद्भवतील.
13:24-25 mxj5 त्या दिवसांच्या संकटानंतर आकाशातील दिव्यांचे आणि बळे यांचे काय होईल? सूर्य आणि चंद्र अंधकारमय होतील, आकाशातून तारे गळून पडतील. आकाशातील बळे डळमळतील.
13:26 ctur मेघांमध्ये लोकांना काय दिसेल? त्यांना मनुष्याचा पुत्र मोठ्या सामर्थ्याने आणि वैभवाने मेघांमध्ये येताना दिसेल.
13:27 kyem मनुष्याचा पुत्र आल्यावर काय करेल? मनुष्याचा पुत्र पृथ्वी आणि आकाशाच्या सीमेपासून आपल्या निवडलेल्यांना एकत्र करेल.
13:30 zo90 या सर्व गोष्टी घडल्याशिवाय काय नाहीशी होणार नाही असे येशूने सांगितले? येशूने म्हटले की त्याची वचने कधीही नष्ट नाहीत.कधीही नष्ट होणार नाही असे येशूने काय म्हटले?
13:31 oxg8 या सर्व गोष्टी कधी घडतील असे येशू म्हणाला? येशू म्हणाला की, पित्याखेरीज कोणालाही हा दिवस किंवा तास माहित नाही.
13:32 pmdn या सर्व गोष्टी कधी घडतील असे येशू म्हणाला? येशू म्हणाला की, पित्याखेरीज कोणालाही हा दिवस किंवा तास माहित नाही.
13:33 mck3 समय आल्यावर येशूने आपल्या शिष्यांना काय करण्याची आज्ञा दिली? येशूने आपल्या शिष्यांना सावध असा, जागृत राहा आणि प्रार्थना करा असे सांगितले.
13:35 zfgp येशूने आपल्या शिष्यांना त्याच्या येण्याविषयी कोणती आज्ञा दिली? येशूने आपल्या शिष्यांना त्याच्या येण्याची वाट पाहत सावध राहण्यास सांगितले.
13:37 c6rm येशूने आपल्या शिष्यांना त्याच्या येण्याविषयी कोणती आज्ञा दिली? येशूने आपल्या शिष्यांना सावध राहण्यास आणि दक्ष राहण्यास सांगितले.
14:1 l7mb मुख्य याजक आणि शास्त्री काय करण्याचा विचार करत होते? येशूला कपटाने कसे धरावे आणि नंतर त्याला कसे जीवे मारावे याचा ते विचार करत होते.
14:2 ezqi मुख्य याजकांना आणि शास्त्र्यांना बेखमीर भाकरीच्या सणाच्या वेळी असे कृत्य करण्याची इच्छा का झाली नाही? लोकांमध्ये दंगल निर्माण होईल, अशी भीती त्यांना वाटत होती.
14:3 lyx4 कुष्टरोगी शिमोन याच्या घरी एका स्त्रीने येशूसाठी काय केले? एका स्त्रीने फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली कुपी फोडली आणि ती येशूच्या मस्तकावर ओतली.
14:5 tn7q त्या स्त्रीला काही जण कशासाठी कुरकुर करत होते? सुगंधी तेलाने भरलेली कुपी न विकल्याबद्दल आणि गरिबांना पैसे न दिल्याबद्दल काही जण स्त्रीविषयी कुरकुर करत होते.
14:8 rqmp त्या स्त्रीने त्याच्यासाठी काय केले आहे असे येशू म्हणाला? येशू म्हणाला की, त्या स्त्रीने उत्तराकार्यासाठी त्याच्या शरीराला अभिषेक केला आहे.
14:9 s2sy त्या स्त्रीने जे काही केले त्याबद्दल येशूने कोणते अभिवचन दिले होते? येशूने अभिवचन दिले की संपूर्ण जगात जिथे जिथे सुवार्तेची घोषणा केली जाईल, त्या स्त्रीने जे केले ते तिच्या स्मरणार्थ सांगितले जाईल.
14:10 rueu यहूदा इस्कर्योत मुख्य याजकांकडे का गेला? यहूदा इस्कर्योत मुख्य याजकांकडे गेला, यासाठी की तो येशूला त्यांच्या स्वाधीन करू शकेल.
14:12-15 glcb शिष्यांना ती जागा कशी मिळाली जिथे ते सर्व जण वल्हांडनाचे जेवण करतील? येशूने त्यांना सांगितले की, त्यांनी नगरात जा आणि पाण्याचे मडके घेऊन जाणाऱ्या एका माणसाच्या मागे जा आणि नंतर त्याला विचारा की उतरण्याची जागा कोठे आहे ज्याचा उपयोग ते वल्हांडनाचे जेवण करण्यासाठी करतील.
14:18 kkmc ते मेजावर बसून जेवत असताना येशू काय म्हणाला? येशूने सांगितले की त्याच्याबरोबर जेवणारा एक शिष्य त्याला धरून देईल.
14:20 grhr कोणता शिष्य त्याला धरून देईल असे येशूने सांगितले? येशूने म्हटले की, जो शिष्य त्याच्याबरोबर ताटात भाकरी बुडवत आहे तो त्याला धरून देईल.
14:21 lk7c जो शिष्य त्याला धरून देईल त्याच्या नशिबाबद्दल येशू काय म्हणाला? येशू म्हणाला की, जर तो जन्माला आला नसता तर ते त्याला चांगले झाले असते.
14:22 jok6 येशू शिष्यांना भाकरी मोडून देताना काय म्हणाला? येशू म्हणाला, "हे घ्या. हे माझे शरीर आहे."
14:24 apk9 येशू शिष्यांना प्याला देताना काय म्हणाला? येशू म्हणाला, "हे माझे कराराचे रक्त आहे, ते रक्त पुष्कळांकरिता ओतले जात आहे."
14:25 r9so तो पुन्हा कधी द्राक्षरस पिईल असे येशू म्हणाला? येशूने सांगितले की ज्या दिवशी त्याने देवाच्या राज्यात द्राक्षरस नव्याने पिईन.
14:27 yns3 जैतुनाच्या डोंगरावर येशूने त्याच्या शिष्यांबद्दल काय भविष्य केले? येशूने भविष्यवाणी केली की त्याच्यामुळे त्याचे सर्व शिष्यांची दाणादाण होईल.
14:30 gvoq पेत्राने मी कधीही अडखळणार नाही असे म्हटल्यानंतर येशू पेत्राला काय म्हणाला? येशू पेत्राला म्हणाला की कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी, पेत्र तीन वेळा येशूला नकारेल.
14:32-34 v9za प्रार्थना करताना येशूने त्याच्या तीन शिष्यांना काय करण्यास सांगितले? येशूने त्यांना तेथेच थांबून जागृत राहण्यास सांगितले.
14:35 uvgs येशूने कशासाठी प्रार्थना केली? येशूने प्रार्थना केली की ही घटका त्याच्यापासून टळून जावो.
14:36 u792 पित्याला केलेल्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून येशू काय स्वीकारण्यास तयार होता? येशू त्याच्यासाठी पित्याची जी काही इच्छा असेल ती स्वीकारण्यास तयार होता.
14:37 vaa4 तीन शिष्यांकडे परत आल्यावर येशूला काय आढळले? येशूला तीन शिष्य झोपलेले आढळले.
14:40 tadu दुसऱ्यांदा प्रार्थना करून परत आल्यावर येशूला काय दिसले? येशूला तीन शिष्य झोपलेले दिसले.
14:41 yc6c तिसऱ्यांदा प्रार्थना करून परतल्यावर येशूला तिसऱ्यांदा काय दिसले? येशूला तीन शिष्य झोपलेले दिसले.
14:44-45 xku4 येशू कोणता आहे हे पहारेकऱ्यांना दाखवण्यासाठी यहूदाने कोणती खूण दिली? येशू कोणता आहे हे दाखवण्यासाठी यहूदाने येशूचे चुंबन घेतले.
14:48-49 afwa येशूने त्याला धरून देण्यास शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी काय केले जात होते असे म्हटले? येशूने म्हटले की, शास्त्रलेखपूर्ण होत आहे कारण ते त्याला लुटारूवर तलवारी आणि सोटे घेऊन अटक करण्यासाठी आले आहेत.
14:50 v5q7 येशूला धरण्यात आले तेव्हा येशूबरोबर असलेल्या लोकांनी काय केले? येशूबरोबर असलेले लोक त्याला सोडून पळून गेले.
14:51-52 xj5b येशूला धरण्यात आले तेव्हा येशूच्या मागोमाग चालणाऱ्या एका तरुणाने काय केले? त्या तरुणाने आपली तागाची वस्त्रे तिथेच सोडून नग्न अवस्थेत पळून गेला.
14:53-54 mcjr येशूला मुख्य याजकाकडे नेण्यात आले तेव्हा पेत्र कुठे होता? पेत्र पहारेकऱ्यांमध्ये, विस्तवाजवळ शेकत बसला होता.
14:55-56 k3gb येशू विरुद्ध न्यायसभेत दिलेल्या साक्षीत काय गैर होते? येशूच्या विरोधात दिलेली साक्ष खोटी होती आणि त्यामध्ये मेळ नव्हता.
14:61 g1ev येशू कोण आहे याबद्दल मुख्य याजकाने येशूला कोणता प्रश्न विचारला? मुख्य याजकाने येशूला विचारले की, धन्यवादिताचा पुत्र जो ख्रिस्त तो तू आहेस काय?
14:62 rabu मुख्य याजकाच्या प्रश्नाला येशूने काय उत्तर दिले? येशूने उत्तर दिले, "मी आहे."
14:64 xher येशूचे उत्तर ऐकून, मुख्य याजकाने येशू दोषी आहे याविषयी काय म्हटले? मुख्य याजक म्हणाले की येशू दुर्भाषण करितो तो दोषी आहे.
14:65 if4h येशूला मरणदंडास पत्र ठरविल्यानंतर त्यांनी त्याचे काय केले? ते त्याच्यावर थुंकले, त्याला मारले आणि मारहाण केली.
14:66-68 tjt2 पेत्र येशूबरोबर होता असे म्हणणाऱ्या नोकर मुलीला पेत्राने काय उत्तर दिले? पेत्राने उत्तर दिले की मुलगी काय बोलत आहे हे त्याला ठाऊक नाही किंवा समजतही नाही.
14:71 orue पेत्राला तिसऱ्यांदा विचारले गेले की तो येशूच्या शिष्यांपैकी एक आहे का तेव्हा पेत्राने काय प्रतिसाद दिला? पेत्राने शापोच्चारण करून आणि स्वतःला शापाखाली ठेवले की तो येशूला ओळखत नाही.
14:72 dgcn पेत्राने तिसऱ्यांदा उत्तर दिल्यानंतर काय झाले? पेत्राने तिसऱ्यांदा उत्तर दिल्यानंतर कोंबडा दुसऱ्यांदा आरवला.
14:72 wesn कोंबडा आरवलेला ऐकल्यानंतर पेत्राने काय केले? कोंबड्याचा आवाज ऐकून त्याचे अवसान सुटले व संकोच न करता मोठा गळा काढून रडला.
15:1 myuo पहाटे, मुख्य याजकांनी येशूबरोबर काय केले? पहाटे, त्यांनी येशूला बांधून पिलाताच्या स्वाधीन केले.
15:5 w0fh मुख्य याजक येशूवर अनेक आरोप करीत असताना, येशूबद्दल पिलाताला काय आश्चर्य वाटले? येशूने त्याला उत्तर दिले नाही याचे पिलाताला आश्चर्य वाटले.
15:6 juii सणाच्या वेळी पिलात सहसा जमावासाठी काय करत असे? पिलात सहसा सणाच्या वेळी जमावाने विनंती केलेल्या एका कैद्याला सोडतो.
15:10 c38r पिलाताला येशूला जमावात का सोडायचे होते? हेव्याने मुख्य याजकांनी येशूला त्याच्या कडे सोपवले होते हे पिलाताला ठाऊक होते.
15:11 cjv6 कोणाच्या सुटकेसाठी जमावाने आरडाओरडा केला? बरब्बाच्या सुटकेसाठी जमावाने आरडाओरडा केला.
15:12-13 v1o8 यहुद्यांच्या राजाबरोबर काय करावे असे जमावाने सांगितले? यहुद्यांच्या राजाला वधस्तंभावर खिळावे, असे जमावाने सांगितले.
15:17 hku5 सैनिकाच्या गटाने येशूला कसे कपडे घातले? सैनिकांनी येशूवर जांभळ्या रंगाचे वस्त्र घातले आणि त्याच्यावर काट्यांचा एक गुंफलेला मुकुट घातला.
15:21 vt0v येशूचा वधस्तंभ कोणी वाहिला? शिमोन कुरनेकर नावाच्या चालत जाणाऱ्या एकाला येशूचा वधस्तंभ वाहून नेण्यास भाग पाडले गेले.
15:22 ekh7 ज्या ठिकाणी सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खीळण्यासाठी आणले त्या ठिकाणाचे नाव काय होते? त्या ठिकाणाचे नाव गुलगुथा, ज्याचा अर्थ कवटीचे ठिकाण असा होतो.
15:24 osm6 सैनिकांनी येशूच्या कपड्यांचे काय केले? सैनिकांनी येशूच्या वस्त्रांसाठी चीठ्या टाकून ते वाटून घेतले.
15:26 pb4n सैनिकांनी फलकावर येशूवर कोणता आरोप लिहिला होता? सैनिकांनी फलकावर "यहुद्यांचा राजा" असे लिहिले.
15:29-30 dh4r जे तिथून गेले त्यांनी येशूला काय आव्हान दिले? तिथून गेलेल्या लोकांनी येशूला स्वतःला वाचवण्याचे आणि वधस्तंभावरून खाली उतरण्याचे आव्हान दिले.
15:31-32 o4cc मुख्य याजकांनी काय सांगितले की येशूने काय केले पाहिजे यावरून ते विश्वास ठेवतील? मुख्य याजकांनी सांगितले की येशूने वधस्तंभावरून खाली यावे यावरून ते विश्वास ठेवतील.
15:32 wdk2 मुख्य याजकांनी येशूची निंदा करताना त्याच्यासाठी कोणती उपाधी वापरली? मुख्य याजकांनी येशूला ख्रिस्त आणि इस्राएलचा राजा असे संबोधले.
15:33 ppto सहाव्या तासात काय घडले ? सहाव्या तासात संपूर्ण भूमीवर अंधार पसरला.
15:34 t3wi नवव्या तासात येशू मोठ्याने काय बोलला? येशू ओरडला, "माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?"
15:37 x92v येशूने मरण्यापूर्वी काय केले? येशू मरणापूर्वी मोठ्याने आरोळी मारली .
15:38 jdq8 येशू चा मृत्यू झाला तेव्हा मंदिरात काय घडले? येशूचा मृत्यू झाला तेव्हा मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात विभागला गेला होता.
15:39 tf5m येशूचा मृत्यू कसा झाला हे पाहून शताअधीपतीने काय साक्ष दिली? खरोखर हा माणूस देवाचा पुत्र आहे, अशी साक्ष शताअधीपतीने दिली.
15:42 mthb येशूचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला? शब्बाथच्या आदल्या दिवशी येशू मरण पावला.
15:43-46 yusf येशूच्या मृत्यूनंतर अरिमथाईकर योसेफाने काय केले? अरिमथाईकर योसेफाने येशूला वधस्तंभावरून खाली उतरवले आणि त्याला कापडात गुंडाळले, आणि त्याला कबरेच्या प्रवेशद्वारा वरची धोंड लोटून त्याला कबरेत ठेवले.
16:1-2 l3lc येशूच्या शरीरावर अभिषेक करण्यासाठी स्त्रिया त्याच्या कबरेत कधी गेल्या? आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सूर्य उगवल्यावर स्त्रिया कबरेत गेल्या.
16:4 b2oz प्रवेशद्वारावर खूप मोठी धोंड असतानाही त्या स्त्रियांनी कबरेत प्रवेश कसा केला? कोणीतरी प्रवेशद्वारासामोरील खूप मोठी धोंड बाजूला केली होती.
16:5 habp कबरेत प्रवेश केल्यावर स्त्रियांना काय दिसले ? उजव्या बाजूला पांढरा पोशाख परिधान केलेला एक तरुण बसलेला महिलांना दिसला.
16:6 nvic तो तरुण येशूबद्दल काय म्हणाला? तो तरुण म्हणाला की, येशू उठला आहे आणि येथे नाही.
16:7 iqwx तरुणाने शिष्य येशूला कोठे भेटतील असे सांगितले? त्या तरुणाने सांगितले की शिष्य गालीलमध्ये येशूला भेटतील.
16:9 mgj4 पुनरुत्थानानंतर येशू प्रथम कोणाला दिसला? येशूने प्रथम मरिया मग्दालीया हिला दर्शन दिले.
16:11 ge9j जेव्हा मरियाने येशूला जिवंत पाहिले असल्याचे सांगितले तेव्हा येशूच्या शिष्यांनी कसा प्रतिसाद दिला? शिष्यांनी विश्वास ठेवला नाही.
16:13 bhrb जेव्हा इतर दोन लोकांनी त्यांना सांगितले की त्यांनी येशूला जिवंत पाहिले आहे तेव्हा येशूच्या शिष्यांनी कसा प्रतिसाद दिला? शिष्यांनी विश्वास ठेवला नाही.
16:14 f1b4 जेव्हा तो शिष्यांना दिसला, तेव्हा येशूने त्यांच्या अविश्वासाबद्दल त्यांना काय सांगितले? येशूने शिष्यांना त्यांच्या अविश्वासाबद्दल फटकारले.
16:15 zvc5 येशूने शिष्यांना कोणती आज्ञा दिली? येशूने शिष्यांना सर्व जगात जाऊन सुवार्तेचा प्रचार करण्याची आज्ञा दिली.
16:16 p7ix कोणाचे तारण होईल असे येशूने सांगितले होते? जे विश्वास ठेवतात आणि बाप्तिस्मा घेतात त्यांचे तारण होईल असे येशूने म्हटले होते.
16:16 u11w येशूने कोणाला सांगितले की त्यांना शिक्षा केली जाईल? जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना शिक्षा केली जाईल, असे येशू म्हणाला.
16:17-18 l58h ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्याबरोबर कोणती चिन्हे होतील असे येशूने सांगितले होते? येशूने सांगितले की, जे विश्वास ठेवतात ते भुते काढतील, नवीन भाषांमध्ये बोलतील, कोणत्याही प्राण घातक गोष्टीची बाधा त्यांना होणार नाहीत आणि ते इतरांना बरे करतील.
16:19 bac6 येशू शिष्यांशी बोलल्यानंतर त्याचे काय झाले? शिष्यांशी बोलल्यानंतर येशूला स्वर्गात घेण्यात आले आणि देवाच्या उजव्या हाताला बसविण्यात आले.
16:20 wd92 तेव्हा शिष्यांनी काय केले? त्यानंतर शिष्य निघून गेले आणि त्यांनी सर्वत्र प्रचार केला.
16:20 f45x तेव्हा परमेश्वराने काय केले? त्यानंतर परमेश्वराने शिष्यांबरोबर काम केले आणि चमत्कारिक चिन्हांसह वचनाचे समर्थन केले.
Can't render this file because it contains an unexpected character in line 8 and column 275.