Delete work in progress tq_JAS.tsv to prepare for release

Signed-off-by: unfoldingWord <info@unfoldingword.org>
This commit is contained in:
unfoldingWord 2024-05-30 08:51:42 +00:00
parent ebea9ab78e
commit 0e2696d33d
1 changed files with 0 additions and 73 deletions

View File

@ -1,73 +0,0 @@
Reference ID Tags Quote Occurrence Question Response
1:1 hfmm याकोबाने हे पत्र कोणाला लिहिले? याकोबाने हे पत्र बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना लिहिले.
1:2 zycm परिक्षांना सामोरे जात असताना, याकोब आपल्या वाचकांना कोणती वृत्ती बाळगण्यास सांगतो? याकोब म्हणतो की जेव्हा परिक्षांना सामोरे जातो तेव्हा त्यास आनंद समजा.
1:3 s4qd आपल्या विश्‍वासाच्या परिक्षेने काय उत्पन्न होते? आपल्या विश्‍वासाच्या परिक्षेने धीर उत्पन्न होते
1:5 jk2m आपल्याला आवश्यकता असल्यास आपण देवाला काय मागावे? आपल्याला आवश्यकता असल्यास आपण देवाकडे ज्ञान मागितले पाहिजे.
1:6 s23b संशय धरणारा कसा असतो? जो संशय घेतो तो समुद्रातील लाटेसारखा असतो जो वाऱ्याने उचंबळल्या जातो..
1:7-8 wg4z संशयाने विचारणाऱ्याने काय मिळण्याची अपेक्षा करावी? जो कोणी संशयाने विचारतो त्याने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल अशी अपेक्षा करू नये.
1:10 u52h धनवानाने नम्र का असावे? धनवानाने नम्र असले पाहिजे कारण तो फुलांप्रमाणेच नाहीसा होईल.
1:11 a2s9 धनवानाची तुलना कशाबरोबर करता येईल? धनवानाची तुलना गवताच्या फुलाबरोबर केली जाऊ शकते जे कोमेजते, गळून जाते आणि नष्ट होते.
1:12 od29 विश्वासाच्या परिक्षेत खरे उतरणाऱ्यांना काय मिळणार? जे विश्वासाच्या परिक्षेत टिकतील त्यांना जीवनाचा मुकुट प्राप्त होईल.
1:14 x6ab मनुष्याला वाईटाचा मोह कशामुळे होतो? एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या वाईट इच्छांमुळे त्याला वाईट गोष्टींचा मोह होतो.
1:15 vd5u परिपक्व झालेल्या पापांचे परिणाम काय आहेत? परिपक्व झालेल्या पापांचे परिणाम म्हणजे मृत्यू होय.
1:17 i17z प्रकाशाच्या पित्यापासून काय उतरते? प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक परिपूर्ण दान हे प्रकाशाच्या पित्यापासून उतरते.
1:18 eqtc देवाने आपल्याला जीवन देण्यासाठी कोणत्या माध्यमाद्वारे निवडले? देवाने आपल्याला सत्याच्या वचनाद्वारे जीवन देण्यास निवडले.
1:19 d5qw याकोब आपल्याला आपले ऐकणे, बोलणे आणि भावनांबद्दल काय करण्यास सांगतो? याकोब आपल्याला ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमे आणि रागास मंद असण्यास सांगतो..
1:22 cqtx आपण कशाप्रकारे स्वतःला फसवू शकतो असे याकोब म्हणतो? याकोब म्हणतो की जर आपण केवळ वचन ऐकणारे बनून त्याप्रमाणे न करणारे असलो तर आपण स्वतःला फसवू शकतो.
1:26 gjxc आपण खऱ्या अर्थाने धर्मनिष्ठ बनण्याकरीता कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे? आपण खऱ्या अर्थाने धर्मनिष्ठ बनण्याकरीता जिभेवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
1:27 waey देवासमोर शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे काय? देवासमोर शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ आणि विधवांचा समाचार घेणे आणि जगाच्या भ्रष्टतेपासून स्वतःचे रक्षण करणे.
2:1 shcx विश्वासणाऱ्यांनी कोणती वृत्ती बाळगू नये? त्यांच्याठायी पक्षपाताची वृत्ती नसावी.
2:3 r2in विश्वासणारे त्यांच्या सभेत प्रवेश करणाऱ्या एका धनवान व्यक्तीला काय सांगत आहेत? ते त्याला समोर येऊन उत्तम ठिकाणी बसण्यास सांगत आहेत.
2:3 xoj5 विश्वासणारे त्यांच्या सभेत प्रवेश करणाऱ्या एका गरीब व्यक्तीला काय सांगत आहेत? ते त्याला दूर उभे राहण्यास किंवा एका कमी दर्जाच्या ठिकाणी बसण्यास सांगत आहेत.
2:4 xhf4 विश्वासणारे आपल्या पक्षपातीपणामुळे काय बनले आहेत? ते दुष्ट विचारांचे न्यायाधीश झाले आहेत.
2:5 zgpo देवाने गरिबांना निवडल्यासंबंधी याकोब काय म्हणतो? याकोब म्हणतो की देवाने गरीबांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यासाठी आणि राज्याचे वारस होण्यासाठी निवडले.
2:6-7 q92n धनवान लोक काय करत आहेत असे याकोब म्हणतो? याकोब म्हणतो की धनवान लोक बांधवांवर अत्याचार करीत आहेत आणि देवाच्या नावाची निंदा करीत आहेत.
2:8 vce9 शास्त्रलेखातील राजमान्य नियम कोणता आहे? "तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर" हा राजमान्य नियम आहे.
2:10 bb6b जो देवाच्या नियमांपैकी एक नियम मोडतो तो कशाविषयी दोषी आहे? जो कोणी देवाच्या नियमांपैकी एकाला मोडतो तो सर्व नियम मोडण्याबाबत दोषी आहे.
2:13 er1a ज्यांनी दया दाखवली नाही त्यांचे काय होईल? ज्यांनी दया दाखवली नाही त्यांचा दयेविना न्याय होईल.
2:14 pr7g जे लोक विश्वास ठेवण्याचा दावा करतात, परंतु गरजूंना मदत करत नाहीत त्यांच्याविषयी याकोब काय म्हणतो? याकोब म्हणतो की जे लोक विश्वास ठेवण्याचा दावा करतात परंतु गरजूंना मदत करत नाहीत तर त्यांचा विश्वास त्यांना तारण्यास समर्थ नाही.
2:16 gdhh एखाद्या गरीब व्यक्तीला उबदार व्हा आणि तृप्त व्हा असे म्हटले, परंतु त्यांना काहीही दिले नाही तर काय हे त्यांच्याकरिता मदत होईल? नाही, एखाद्या गरीब व्यक्तीला आपण उबदार होण्यास किंवा खाण्यास काही दिले नाही तर ती त्यांच्याकरिता सहाय्यता होणार नाही.
2:17 fpr8 विश्वासासह कार्य नसेल, तर ते स्वतःचं काय आहे? विश्वासासह कार्य नसेल तर ते स्वतःच निर्जीव असे आहे.
2:18 r57z कशाप्रकारे आपण आपला विश्वास दाखवला पाहिजे असे याकोब म्हणतो? याकोब म्हणतो की आपण आपल्या कृतींद्वारे आपला विश्वास दाखवला पाहिजे.
2:19 felv दुष्ट आत्मे आणि विश्वास धरण्याचा दावा करणारे दोघेही कशावर विश्वास ठेवतात? विश्वास धरण्याचा दावा करणारे लोक आणि दुष्ट आत्मे दोघेही एकच देव असल्याचे मानतात.
2:21 cex0 अब्राहामाने त्याच्या कृतींद्वारे त्याचा विश्वास कसा प्रदर्शित केला? अब्राहामाने वेदीवर इसहाकाचे अर्पण करण्याच्या त्याच्या कृतींद्वारे आपला विश्वास प्रदर्शित केला.
2:22 mshq अब्राहामाचा विश्वास कसा परिपूर्ण झाला? अब्राहामाचा विश्वास त्याच्या कृत्यांनी परिपूर्ण झाला.
2:23 fs91 अब्राहामाच्या विश्वासाने आणि कृतींनी कोणते शास्त्रवचन पूर्ण झाले? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले” हे शास्त्रवचन पूर्ण झाले.
2:25 eoxe राहाबने तिच्या कृतींमधून तिचा विश्‍वास कसा प्रदर्शित केला? राहाबने दूतांचे स्वागत करून त्यांना दुसऱ्या रस्त्याने पाठवले तेव्हा तिने तिच्या कृतीतून आपला विश्वास दाखविला.
2:26 nfj5 आत्म्याशिवाय शरीर काय आहेत? आत्म्याशिवाय शरीर हे मृत आहेत.
3:1 v31b अनेकांनी शिक्षक होऊ नये असे याकोब का म्हणतो? अनेकांनी शिक्षक होऊ नये कारण त्यांना अधिक न्याय प्राप्त होईल.
3:2 ef6y कोण अडखळतो आणि किती प्रकारे? आपण सगळेचं अनेक प्रकारे अडखळतो.
3:2 ns4x कोणत्या प्रकारची व्यक्ती आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे? जो व्यक्ती आपल्या शब्दांत अडखळत नाही तो त्याच्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे..
3:3 sfjt जहाज चालकाला जिथे जायचे आहे तिथे मोठ्या जहाजाला वळविण्यास कोणती छोटी गोष्ट सक्षम आहे? एक लहान सुकाणु मोठ्या जहाजाला वळविण्यास सक्षम आहे.
3:4 s8n4 कोणती छोटी गोष्ट अरण्यास मोठी आग लावू शकते? एक लहानशी आग अरण्यास मोठी आग लावण्यास समर्थ आहे.
3:6 ebm5 पापमय जीभ संपूर्ण शरीराचे काय करू शकते? पापमय जीभ संपूर्ण शरीराला मलिन करण्यास सक्षम आहे.
3:8 yjfd मनुष्यांपैकी कोणालाच काय काबूत ठेवता आले नाही? जिभेवर नियंत्रण ठेवण्यास मनुष्यांपैकी कोणीही सक्षम नाही.
3:9 av25 लोक देवाबरोबर आणि माणसांबरोबर कोणत्या दोन मार्गांद्वारे त्यांच्या जिभेने व्यवहार करतात? एकाच जिभेने ते देवाला स्तुती देतात आणि माणसांना शाप देतात.
3:11 id89 झऱ्यातून कोणत्या दोन गोष्टी निघू शकत नाही? एकचं झरा गोड आणि कडू हे दोन्ही पाणी देऊ शकत नाही.
3:13 gkvc एखादी व्यक्ती ज्ञान आणि समंजसपणा कसे दाखवतील? एखादी व्यक्ती नम्रतेने केलेल्या आपल्या कृतींद्वारे ज्ञान आणि समंजसपणा दाखवतील.
3:15 ci1j कोणत्या प्रकारचे ज्ञान एखाद्या व्यक्तीला मत्सर आणि महत्वाकांक्षी आणि खोटे बोलण्यास प्रवृत्त करते? ऐहिक, आत्मीय आणि सैतानाकडले ज्ञान माणसाला मत्सर आणि महत्त्वाकांक्षी आणि खोटे बोलण्यास प्रवृत्त करते.
3:16 aj54 मत्सर आणि महत्त्वाकांक्षेचे काय परिणाम होतात? मत्सर आणि महत्वाकांक्षा अस्वस्थता आणि प्रत्येक दुष्ट कृत्यास कारणीभूत ठरते.
3:17 skge वरून येणारे ज्ञान कोणती वृत्ती दर्शविते? शांतिप्रिय, सौम्य, मनमिळावू, दया आणि चांगल्या फळांनी परिपूर्ण, अपक्षपाती आणि प्रामाणिक असलेल्या व्यक्तीला वरून येणारे ज्ञान आहे.
4:1 fjgf याकोब म्हणतो की विश्वासणाऱ्यांमध्ये भांडण आणि वाद कशाद्वारे निर्माण होतात? त्यांच्यामध्ये युद्ध करणार्‍या वाईट इच्छा या गोष्टींचा स्त्रोत आहे.
4:3 ohar विश्वासणाऱ्यांना देवाकडे केलेल्या मागण्या का प्राप्त होत नाहीत? त्यांना मिळत नाही कारण ते त्यांच्या दुष्ट इच्छांवर खर्च करण्यासाठी अयोग्य प्रकारे गोष्टी मागतात.
4:4 cwrc जर एखाद्या व्यक्तीने जगाचा मित्र होण्याचे ठरविले तर त्या व्यक्तीचा देवाबरोबर कोणता संबंध आहे? जो व्यक्ती जगाचा मित्र होण्याचे ठरवितो तो स्वतःला देवाचा वैरी बनवतो.
4:6 yy3h देव कोणाचा विरोध करतो आणि तो कोणावर कृपा करतो? देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु नम्र लोकांवर कृपा करतो.
4:7 gzwe जेव्हा एखादा विश्वासू व्यक्ती स्वतःला देवाच्या अधीन करतो आणि सैतानाला अडवतो तेव्हा सैतान काय करेल? सैतान पळून जाईल.
4:8 c3fr जे देवाजवळ येतात त्यांच्याकरीता तो काय करणार? जे देवाजवळ येतात त्यांच्या जवळ तो येईल.
4:11 e4nr याकोब विश्वासणाऱ्यांना काय करू नये असे सांगतो? याकोब विश्वासणाऱ्यांना एकमेकांविरुद्ध बोलू नका असे सांगतो.
4:15 wedj भविष्यात काय घडणार आहे याविषयी याकोब विश्वासणाऱ्यांना काय बोलण्यास सांगतो? याकोब विश्वासणाऱ्यांना असे बोलण्यास सांगतो की जर प्रभूने अनुमती दिली तर आपण जगू आणि अमुक अमुक करू.
4:16 iiz3 जे आपल्या योजनांबद्दल फुशारकी मारतात त्यांच्याविषयी याकोब काय म्हणतो? याकोब म्हणतो की जे आपल्या योजनांबद्दल फुशारकी मारतात ते वाईट करीत आहेत.
4:17 gy3y एखाद्याला चांगलं करायचे कळत असून जो ते करीत नाही तर ते काय आहे? जर एखाद्याला चांगले करणे कळत असून ते तो करीत नाही तर ते पाप आहे.
5:3 akso धनवान, ज्यांच्याविषयी याकोब बोलत आहे, त्यांनी शेवटल्या दिवसांसाठी काय केले आहे जे त्यांच्याविरुद्ध साक्ष देईल? धनवानांनी आपली संपत्ती साठविली आहे.
5:4 l7o1 हे धनवान आपल्या कामगारांशी कसे वागले? या धनवानांनी आपल्या कामगारांना मजुरी दिलेली नाही.
5:6 add4 या धनवानांनी नीतिमान लोकांना कसे वागवले आहे? या धनवानांनी नीतिमान लोकांची निंदा करून ठार केले आहे.
5:7 h3jr याकोब म्हणतो की प्रभूच्या येण्याकडे विश्वासणाऱ्यांचा दृष्टिकोन काय असावा? विश्वासणाऱ्यांनी प्रभूच्या येण्याची धीराने वाट पहावी.
5:8 tl7n विश्वासणाऱ्यांनी प्रभूच्या येण्याची धीराने वाट पाहत त्यांचे अंतःकरणे बळकट का करावे? त्यांनी आपली अंतःकरणे बळकट करावेत कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे.
5:10 htuc जुन्या करारातील संदेष्ट्त्यांचे दुःख सहन आणि धीर आपल्यासाठी काय असले पाहिजे? जुन्या करारातील संदेष्ट्त्यांचे दुःख सहन आणि धीर आपल्यासाठी एक उदाहरण असले पाहिजे.
5:11 mdqn ईयोबाने कोणते सकारात्मक वैशिष्ट्य दाखविले? ईयोबाने धीराचे प्रदर्शन केले.
5:12 n35b याकोब विश्वासणाऱ्यांच्या “होय” आणि “नाही” च्या विश्वासनीयतेबाबत काय म्हणतो? विश्वासणाऱ्यांच्या “होय” चा अर्थ “होय” असावा आणि त्यांच्या “नाही” चा अर्थ “नाही” असावा.
5:14 fdup जे आजारी आहेत त्यांनी काय करावे? आजारी व्यक्तीने वडिलधाऱ्यांना बोलावले पाहिजे जेणेकरून ते त्याला तेलाने अभिषेक करून त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतील
5:16 zww3 विश्वासणाऱ्यांनी बरे होण्यासाठी एकमेकांबरोबर कोणत्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत असे याकोब म्हणतो? विश्वासणाऱ्यांनी एकमेकांबरोबर आपली पातके कबूल करावे आणि एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे.
5:17 h5vg एलीयाने पाऊस पडू नये अशी प्रार्थना केली तेव्हा काय झाले? साडेतीन वर्षे जमिनीवर पाऊस पडला नाही.
5:18 ws26 एलीयाने पुन्हा एकदा पावसासाठी प्रार्थना केली तेव्हा काय झाले? जेव्हा त्याने पुन्हा प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि पृथ्वीने फळ उपजवले.
5:20 c28q पापी माणसाला त्याच्या चुकीच्या मार्गांतून बाहेर काढणारा व्यक्ती काय साध्य करतो? जो व्यक्ती पापी माणसाला त्याच्या चुकीच्या मार्गांतून बाहेर काढतो तो त्याच्या जीवाला मृत्यूपासून वाचवतो आणि अनेक पापांना झाकतो.
Can't render this file because it contains an unexpected character in line 25 and column 238.